'माझ्या मृत्यूनंतर तुला कोण सांभाळणार?' आधी केली लेकीची हत्या अन् मग आईने काय केलं बघा..

एका आईने आपल्या 13 वर्षांच्या मुलीची उशीने गळा दाबून हत्या केली आहे. या हत्येमागचं कारण स्पष्ट झाल्यानंतर पोलिसही आश्चर्यचकित झाले आहेत.

Crime News

Crime News

मुंबई तक

15 Apr 2026 (अपडेटेड: 15 Apr 2026, 04:11 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

'माझ्या मृत्यूनंतर तुला कोण सांभाळणार?'

point

आधी लेकीची हत्या अन् मग आईने केली आत्महत्या

Crime News : एका 45 वर्षीय महिलेने आपल्या 13 वर्षीय अल्पवयीन मुलीची उशीने तोंड दाबून हत्या केली आणि त्यानंतर स्वतः गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सुवर्णा चंद्रशेखर आणि त्यांची मुलगी तारुण्या चंद्रशेखर (13) अशी मृतांची नावे आहेत. सोमवारी (13 एप्रिल) रात्री ही घटना घडली असून, मंगळवारी सकाळी उशिरा या प्रकरणाचा उलगडा झाला. सुवर्णा यांचे पती चंद्रशेखर यांनी कामावरून वारंवार फोन करूनही प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी आपल्या लहान भावाला घरी पाठवले असता ही भीषण घटना उघडकीस आली.

हे वाचलं का?

खिडकीतून दिसले भयंकर दृश्य

चंद्रशेखर यांच्या भावाने सकाळी 11 च्या सुमारास घरी पोहोचून खिडकीतून डोकावून पाहिले असता, सुवर्णा यांचा मृतदेह छताच्या पंख्याला लटकलेल्या अवस्थेत दिसला, तर मुलगी तारुण्या बेडवर मृतावस्थेत पडलेली होती. त्यांनी तातडीने पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, सुवर्णा यांनी प्रथम उशीने तोंड दाबून तारुण्याला ठार केले आणि मुलीचा मृत्यू झाल्याची खात्री पटल्यानंतर स्वतः आत्महत्या केली. घटनास्थळी कोणतीही सुसाईड नोट किंवा मोबाईलमध्ये मेसेज सापडलेला नाही, मात्र सुवर्णा गेल्या काही काळापासून डिप्रेशनमध्ये होत्या, अशी माहिती समोर आली आहे.

हे ही वाचा : कोल्हापूर : उसाच्या शेतात सापडला व्यापाऱ्याचा मृतदेह, 25 लाखांच्या खंडणीसाठी केली निर्घृण हत्या

माझ्या मृत्यूनंतर मुलीला कोण सांभाळणार?

चंद्रशेखर हे एका खासगी रुग्णालयात कॉम्प्युटर ऑपरेटर म्हणून काम करतात, तर तारुण्या एका खासगी शाळेत सातवीत शिकत होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुवर्णा यांना नेहमीच एका गोष्टीची काळजी सतावत होती की, जर त्यांचा मृत्यू झाला तर मुलीचा सांभाळ कोण करेल? त्यासोबतच पती चंद्रशेखर यांना असलेल्या हृदयाच्या व्याधीमुळेही त्या प्रचंड चिंतेत असायच्या. याच मानसिक तणावातून आणि नैराश्यातून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले असावे, असा संशय पोलीस व्यक्त करत आहेत.

हे ही वाचा : पुणे: आंब्यांचे आमिष दाखवून अडीच वर्षांच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार, आई पोहोचताच डोळ्यादेखत... लज्जास्पद प्रकार

क्रिकेटची मॅच आणि हॉटेलमध्ये जेवण 

विशेष म्हणजे, घटनेच्या काही तास आधी सर्व काही सामान्य असल्याचे भासत होते. सोमवारी रात्री या कुटुंबाने घरी एकत्र क्रिकेट सामना पाहिला आणि त्यानंतर बाहेर हॉटेलमध्ये जाऊन जेवणही केले होते. जेवण करून परतल्यानंतर सुवर्णा यांनी थकवा जाणवत असल्याचे सांगून पतीला उद्या सकाळी नाश्ता बनवणार नाही, असे सांगितले होते. त्यामुळे चंद्रशेखर दुसऱ्या खोलीत झोपले आणि सकाळी लवकर घराबाहेर नाश्ता करून कामावर निघून गेले. त्यांच्या जाण्यानंतर ही हृदयद्रावक घटना घडली असून, पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.