मित्राच्या बायकोवर प्रेम केल्याची शिक्षा.., गोड बोलून दारु पाजली आणि जीवंत जाळले

मुंबई तक

• 10:53 AM • 15 Apr 2026

पोलिसांनी एका खुनाचा अवघ्या 12 तासात उलगडा केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. मृत व्यक्ती आणि आरोपी मित्रच असल्याचे समोर आले आहे.

Crime News

Crime News

Google CTA

बातम्या हायलाइट

point

मित्राच्या बायकोवर प्रेम केल्याची शिक्षा..

point

दारु पाजली आणि जीवंत जाळले

Crime News : बिहारच्या मुझफ्फरपूर जिल्ह्यात झालेल्या तरुणाच्या हत्येचा पोलिसांनी अवघ्या 12 तासांत खुलासा केला आहे. या खळबळजनक घटनेत मृताच्या मित्रांचाच हात असल्याचे समोर आले असून, प्रेमसंबंधांच्या वादातून त्यांनी तरुणाची हत्या करून मृतदेह जाळून टाकला. ही घटना बेरुआ डीह गावातील आहे, जिथे 32 वर्षीय बिघन राम याचा अर्ध्यावर जळालेला मृतदेह संशयास्पद परिस्थितीत आढळून आला होता.

हे वाचलं का?

माहिती मिळताच पोलिसांनी आणि एफएसएल (FSL) टीमने घटनास्थळी पोहोचून तपास सुरू केला. मृताच्या पत्नीच्या जबाबावरून एफआयआर नोंदवण्यात आला, त्यानंतर पोलिसांनी त्वरित कारवाई करत दोन आरोपींना अटक केली.

बायकोशी प्रेमसंबंध आणि हत्या

अटक करण्यात आलेल्या आरोपींची ओळख राम प्रवेश पासवान उर्फ ​​पूरण आणि गोरख पासवान उर्फ ​​जितेंद्र अशी झाली आहे. चौकशीदरम्यान दोघांनीही आपला गुन्हा कबूल केला आहे. पोलीस तपासात असे निष्पन्न झाले आहे की, मृत बिघन राम याचे आरोपी राम प्रवेश पासवान याच्या पत्नीशी प्रेमसंबंध होते. यावरून यापूर्वीही वाद झाला होता आणि हे प्रकरण पंचायतीपर्यंत पोहोचले होते, तरीही त्यांचे संबंध सुरूच होते. याच रागातून राम प्रवेशने आपल्या साथीदारासह मिळून हत्येचा कट रचला.

हे ही वाचा : नवरा कोट्याधीश, पण जीम ट्रेनरच्या नादी लागली बायको; प्रकरण कसं आलं उघडकीस? पुढे काय घडलं?

व्हायरल  व्हिडिओमुळे प्रकरणाचा उलगडा

योजनेनुसार, आरोपींनी बिघन राम याला बोलावले आणि दारूमध्ये विष मिसळून त्याला पाजले. त्यानंतर त्याला मारहाण करून त्याची हत्या करण्यात आली. पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह आधी मातीत पुरला आणि नंतर तो जाळून अंत्यसंस्काराचे रूप देण्याचा प्रयत्न केला. मात्र, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमुळे या संपूर्ण प्रकरणाचा उलगडा झाला, त्यानंतर पोलिसांनी वेगाने कारवाई करत दोन्ही आरोपींना पकडले. 

हे ही वाचा : मुंबईची खबर : लवकरच सुरु होणार नवी मेट्रो लाईन, 'या' भागातील प्रवाशांची होणार ट्राफिकमधून सुटका; जाणून घ्या सविस्तर

आरोपींना अटक

या प्रकरणातील दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे. प्रकरणाचा खुलासा करताना एसडीपीओ ईस्ट-२ मनोज कुमार सिंह यांनी सांगितले की, प्रेमसंबंधांमुळेच हे हत्याकांड घडले आहे. सध्या दोन्ही आरोपींना अटक करून कारागृहात पाठवण्यात आले असून पुढील कारवाई सुरू आहे.