मित्रासोबत पिकनिकला गेली अन् फसली, तरुणीसोबत घडलं भयानक कांड

एका तरुणीवर सामूहिक बलात्कार करण्याची घटना घडली आहे. पीडिता आपल्या मित्रासोबत पिकनिकला गेली होती. यावेळी एका झाडाखाली हे दोघे बसले होते.

Crime News

Crime News

मुंबई तक

15 Apr 2026 (अपडेटेड: 15 Apr 2026, 12:55 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

मित्रासोबत पिकनिकला गेली अन् फसली

point

तरुणीसोबत घडलं भयानक कांड

point

नेमकं प्रकरण काय?

Crime News : मित्रासोबत पिकनिकला गेलेल्या एका तरुणीवर दोघांनी सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आरोपींनी पीडितेच्या मित्राला बेदम मारहाण करत ओलिस ठेवले होते. या घटनेमुळे परिसरात चांगलीच खळबळ उडाली आहे. मध्यप्रदेशातील इंदोरमधील ही घटना असून आरोपी सध्या फरार आहेत.

हे वाचलं का?

पिकनिकसाठी गेले आणि घात झाला

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी आपल्या मित्रासोबत पिकनिकसाठी आली होती. त्याठिकाणी असलेल्या देवाचे दर्शन घेतल्यावर दोघेही झाडाखाली विसावा घेण्यासाठी बसले होते. दुपारी २ वाजण्याच्या सुमारास अचानक दोन अज्ञात तरुण तिथे आले आणि त्यांनी पीडितेच्या मित्राला बेदम मारहाण केली. तरुणाला बेदम मारहाण करून त्याला आपल्या ताब्यात ठेवले आणि त्यानंतर दोन्ही आरोपींनी तरुणीवर आळीपाळीने अत्याचार केला.

हे ही वाचा : अमरावती : 180 मुली, 350 व्हिडीओ असल्याचा दावा, सत्य काय? मोबाईलमधून कोणी डाऊनलोड केले व्हिडीओ?

जंगलाचा फायदा घेऊन आरोपी फरार

या कठीण प्रसंगात तरुणाने कशीबशी आपली सुटका करून घेतली आणि तेथून पळ काढत '112' क्रमांकावर फोन करून पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच पोलिसांचे पथक तातडीने घटनास्थळी पोहोचले, मात्र तोपर्यंत आरोपी जंगलाचा फायदा घेत फरार झाले होते. पोलिसांनी संपूर्ण जंगल परिसरात शोधमोहीम राबवली, पण अद्याप आरोपींचा कोणताही सुगावा लागलेला नाही. पीडितेची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून, तिच्या जबाबाच्या आधारे सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे ही वाचा : नवरा कोट्याधीश, पण जीम ट्रेनरच्या नादी लागली बायको; प्रकरण कसं आलं उघडकीस? पुढे काय घडलं?

पीडिता महाविद्यालयीन विद्यार्थिनी, तर मित्र मजूर

इंदूर ग्रामीणचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक रुपेश द्विवेदी यांनी सांगितले की, या प्रकरणाचा गांभीर्याने तपास सुरू असून आरोपींच्या अटकेसाठी पथके तैनात करण्यात आली आहेत. पीडित तरुणी इंदूरमध्ये महाविद्यालयीन शिक्षण घेत असून तिचा मित्र मजुरीचे काम करतो; हे दोन्ही मूळचे नालछा येथील रहिवासी आहेत. मारहाणीत तरुणाच्या हाताला आणि गळ्याला गंभीर दुखापत झाली आहे. बेअरछा जंगल पर्यटकांमध्ये लोकप्रिय असले तरी, सुरक्षेच्या दृष्टीने हा भाग संवेदनशील मानला जातो.