दारू पाजून 5 जणांनी लैंगिक शोषण केल्याचा पीडितेचा आरोप, 22 वर्षीय बायकोला दुसऱ्यांच्या केलं हवाली

मुंबई तक

15 Apr 2026 (अपडेटेड: 15 Apr 2026, 06:29 PM)

crime news : वयाच्या 22 व्या वर्षी तरुणीचा विवाह करण्यात आला होता, पण विवाहामुळेच तिच्या स्वप्नांची राखरांगोळी झाली. हनिमूनच्या रात्री नवऱ्याने बायकोला दुसऱ्याच पाच पुरुषांच्या स्वाधीन केल्याची धक्कादायक घटना आहे. यामुळे संसार सुरु होण्यापूर्वी मोडला आणि या घटनेनं नात्याला काळिमा फासली गेली.

crime news

crime news

Google CTA

बातम्या हायलाइट

point

दारू पाजून 5 जणांनी 'तिचे' लैंगिक शोषण केल्याचा गंभीर आरोप

point

लग्नाच्या पहिल्याच रात्री स्वत:च्या बायकोला दुसऱ्यांच्या हवाली केले

Crime News : वयाच्या 22 व्या वर्षी एका तरुणीचा विवाह करण्यात आला होता, पण विवाहामुळेच तिच्या स्वप्नांची राखरांगोळी झाली होती. हनिमूनच्या रात्री नवऱ्याने बायकोला दुसऱ्याच पाच पुरुषांच्या स्वाधीन केल्याची धक्कादायक घटना आहे. यामुळे संसार सुरु होण्यापूर्वी मोडला आणि या घटनेनं नात्याला काळिमा फासली गेली. ही धक्कादायक घटना तेलंगणा राज्यातील हैदराबाद येथे घडल्याचे वृत्त आहे. तरुणीने नवऱ्यासोबत इतर 5 जणांनी मिळून लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रीय महिला आयोगाने या घटनेची स्वत:हून दखल घेत राज्य पोलिसांकडून सविस्तर अहवाल मागवला. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : डोळ्यात अंगार, नामदेव ढसाळांचा झंझावात मोठ्या पडद्यावर, 'हा' अभिनेता साकारणार भूमिका

लग्नाच्या पहिल्याच रात्री स्वत:च्या बायकोला दुसऱ्यांच्या हवाली केले

या घटनेनं स्थानिक पोलीस प्रशानात मोठी खळबळ उडाल्याचं चित्र आहे. धक्कादायक बाब अशी की, आरोपीने लग्नाच्या पहिल्याच रात्री स्वत:च्या बायकोला दुसऱ्यांच्या हवाली केले होते. महिला आयोगाने लक्ष घालत तेलंगणा पोलीस ठाणे गाठून आरोपीविरुद्ध एफआरआय नोंदवून घेण्यास सांगितला.  नराधांचा शोध सुरु असून तात्काळ अटक कराण्याचे निर्देश देण्यात आले होते. शिवाय पीडितेच्या संरक्षणाची पूर्ण खबरदारी बाळगण्यास सांगितली होती. 

महिला आयोगाने प्रकरण लक्षात घेत सात दिवसांमध्ये कारवाई करत अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले. राष्ट्रीय महिला आयोगाने पीडित नवविवाहितेची प्रतिमा मलिन केली, तसेच विवाह संस्थेच्या पावित्र्याचे उल्लंघन केल्याचे त्यांचे म्हणणे आहे. या कृत्याचा निषेध करत महिला आयोगाने चिंतेची बाब व्यक्त केली. 

दारू पाजून 5 जणांनी 'तिचे' लैंगिक शोषण केल्याचा गंभीर आरोप

महिलेच्या आरोपांनुसार,आंध्र प्रदेशातील नेल्लोर जिल्ह्यात राहणाऱ्या 28 वर्षीय व्यक्तीसोबत तरुणीचं एका कार्यालयात 28 जुलै 2025 रोजी विवाह झाला होता. विवाहानंतर पीडिता नवऱ्यासोबत भाडेतत्वावर राहू लागली होती. लग्नाच्या पहिल्या रात्री नवऱ्याने त्याच पाच मित्रांना घरी बोलावले आणि नवविवाहितेला फुल्ल दारू पाजली होती. तिच्या माहितीनुसार, पीडिता नशेत असताना बेशुद्ध पडली होती, तेव्हा नवऱ्यासह इतर 5 जणांनी तिचे लैंगिक शोषण केल्याचा तिने गंभीर आरोप केला.   

हे ही वाचा : CBSE 10th Result 2026 Declared: सीबीएसई 10वीचा निकाल जाहीर, पाहा संपूर्ण Result

संबंधित प्रकरणाची पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. घडलेल्या घटनेनुसार, सर्व आरोपी फरार असून त्यांची शोधमोहिम सुरु करण्यात आली आहे. पीडितेनं यापूर्वी देखील पोलीस ठाणे गाठून संपर्क साधला होता, मात्र घटनेची माहिती देता समोर आली नाही, पण हा प्रकार बेगमपट परिसरातील असल्याने प्रकरण घेतलं नाही.  पोलिसांच्या माहितीनुसार, प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत सर्व बाबींचा तपास केला आणि आरोपीला अटक केले जाईल अशी माहिती दिली.