American Consulate Attack in Pakistan : अमेरिका आणि इस्रायलच्या 'ऑपरेशन एपिक फ्युरी'मध्ये इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी आणि अनेक दिग्गज कमांडर्स मारले गेल्याच्या वृत्ताने पाकिस्तानातील कराची शहरात प्रचंड उद्रेक झाला आहे. संतापलेल्या शेकडो आंदोलकांनी कराचीतील अमेरिकन दूतावासावर धाव घेत हिंसक निदर्शनं केली, ज्यामुळे संपूर्ण परिसरात तणाव निर्माण झाला आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : खामेनी, मुलगी-जावई-सून, टॉप कमांडर...इस्त्राईल आणि अमेरिकेने टिपून-टिपून मारले
दूतावासाचे गेट तोडण्याचा प्रयत्न आणि दगडफेक
स्थानिक माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, संतप्त जमावाने अमेरिकन दूतावासाचे मुख्य प्रवेशद्वार तोडून आत घुसण्याचा प्रयत्न केला. आंदोलकांनी दूतावासाच्या इमारतीवर जोरदार दगडफेक केली आणि परिसरात टायर जाळून रस्ते रोखून धरले. यावेळी अमेरिका मुर्दाबाद, इस्त्राईल मुर्दाबाद आणि इराण जिंदाबाद अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला होता.
आगीच्या ज्वाळा आणि हिंसाचाराचे थरारक व्हिडिओ
कराचीमधून समोर आलेल्या व्हिडिओमध्ये आंदोलकांच्या हातात लाठ्या-काठ्या दिसत असून, ते दूतावासाच्या खिडक्या आणि दरवाजे फोडताना दिसत आहेत. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, संतप्त जमावाने अमेरिकन दूतावासाला आग लावली. व्हिडिओमध्ये आगीच्या भीषण ज्वाळा आकाशात उठताना आणि धुराचे लोट संपूर्ण परिसरात पसरलेले दिसत आहेत. परिस्थिती इतकी हाताबाहेर गेली होती की, सुरक्षा दलांना या अफाट गर्दीवर नियंत्रण मिळवणे कठीण झाले होते.
हे ही वाचा : पुणे : पिंपरी-चिंचवडमधील 84 विद्यार्थी दुबईत अडकले, इराणने दुबईवर केलेल्या हल्ल्याचा फटका
डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
एककीकडे पाकिस्तानात हिंसाचार सुरू असतानाच, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला पुन्हा एकदा कडक इशारा दिला आहे.'जर इराणने आता कोणतीही आगळीक केली, तर त्यांना असा धडा शिकवू जो तेहरान कधीच विसरणार नाही,' अशा शब्दांत ट्रम्प यांनी नवी धमकी दिली आहे.
धार्मिक आणि राजकीय भावनांचा भडका
कराचीतील या हिंसक आंदोलनामागे केवळ आंतरराष्ट्रीय घडामोडीच नाहीत, तर प्रादेशिक राजकारण आणि धार्मिक भावनांचाही मोठा वाटा असल्याचे मानले जात आहे. मध्य पूर्वेतील या घडामोडींचे पडसाद आता शेजारील मुस्लीम देशांमधील जनमानसावर उमटू लागले असून, कराचीतील या घटनेने जागतिक सुरक्षेसमोर मोठे प्रश्नचिन्ह उभे केले आहे.
ADVERTISEMENT











