दिशा सालियन मृत्यू प्रकरणाची सीबीआय चौकशी करणार, FIR दाखल

मुंबई तक

• 04:56 PM • 14 Sep 2026

Disha salian death case : दिशा सालियान मृत्यू प्रकरणी सीबीआयकडून एफआरआय दाखल करण्यात आला. यानंतर न्यायालयाने पोलिसांच्या तपासावर प्रश्न उपस्थित केलेत.

Disha salian death case

Disha salian death case

Google CTA

बातम्या हायलाइट

point

दिशा सालियान मृत्यू प्रकरणी सीबीआयकडून एफआरआय दाखल

point

उच्च न्यायालयाने मुंबई पोलिसांना फटकारले

Disha Salian Death Case : दिवंगत अभिनेते सुशांत सिंह राजपूतची मॅनेजर दिशा सालियान मृत्यू प्रकरणी सीबीआयने एफआरआय दाखल केला आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी सोमवारी दिली. याच महिन्याच्या सुरूवातीला मुंबई उच्च न्यायालयाने सलियानच्या मृ्त्यूची सीबीआयची चौकशी करण्यात आली होती. या प्रकरणी मुंबई पोलिसांना फटकारण्यात आल्याची माहिती आहे. पोलिसांच्या तपासामुळे उत्तरांहून अधिक प्रश्नच निर्माण झाल्याचं न्यायालयाने म्हटले आहे. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : MBBS डॉक्टरकडून सेमिनारच्या बहाण्याने नर्सवर केले अत्याचार

मुंबई पोलिसांच्या तपासावर न्यायालयाचे प्रश्नचिन्ह

मुंबई पोलिसांच्या तपासावर न्यायालयाने प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. सहा वर्षे हे प्रकरण केवळ एक अपघाती मृत्यू असल्याचे हाताळले गेले असल्याची पोलिसांवर टीका करण्यात आली होती. संबंधित  प्रकरणात तपासातील गंभीर त्रुटी निदर्शनास आणून देण्यात आल्या होत्या. 

दिशा सालियानचा 2020 मध्ये मृत्यू

दिशा सालियानचा मृत्यू हा 2020 मध्ये झाला होता. राजपूतचा व्यवस्थापक म्हणून काही काळ काम केलेल्या सालियानचा, मुंबईतील मालाड परिसरातील एका निवासी इमारतीच्या 12 व्या मजल्यावरून पडून 8 जून 2020 रोजी मृत्यू झाल्याची घटना आहे. या घटनेनं बॉलिवूड क्षेत्र हादरून गेले होते. अशातच सुशांत सिंह राजपूतच्या अपार्टमेंटमध्ये मृतावस्थेत आढळून आला होता, या दोन्ही मृत्यूंमध्ये संभाव्य संबंधात अटकळ सुरू झाली आहे.  

हे ही वाचा : मुंबईत सहा मांजरांसह एका पिल्लाला संपवलं, विखुरलेले आढळले मृतदेह

दरम्यान, सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर गदारोळ निर्माण झाल्याने राज्य सरकारने सीबीआयच्या चौकशीचे आदेश दिले होते. या संस्थेनं सुशांत सिंह राजपूतने जीवन संपवल्याचा अहवाल सादर केला होता. मात्र याबाबद न्यायालयात सुनावणी होणे बाकी आहे.