CM Eknath Shinde Exclusive: 'BJP हा फुटलेला पक्ष नाही मात्र शिवसेना..', CM शिंदेंचं मोठं विधान
CM Eknath Shinde on BJP: 'भाजप हा एकसंध पक्ष आहे पण शिवसेना फुटलेला पक्ष आहे म्हणून आम्हाला कमी जागा मिळाल्या..' असं विधान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई Tak ला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीत केलं आहे.
ADVERTISEMENT
Maharashtra Lok Sabha Election 2024: मुंबई: लोकसभा निवडणूक 2024 (Lok Sabha Election 2024) च्या तिसऱ्या आणि अत्यंत महत्त्वाचा समजल्या जाणाऱ्या टप्प्यातील मतदान आज (7 मे) पार पडलं. याच दरम्यान, मुंबई Tak चे संपादक साहिल जोशी यांनी घेतलेल्या एक्स्क्लुझिव्ह मुलाखतीत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक मोठं विधान केलं आहे. यावेळी त्यांनी जागा वाटपाबाबत बोलत असताना एक असं विधान केलं आहे की, ज्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. जागा वाटपात शिवसेनेला मागील निवडणुकीपेक्षा जागा का कमी मिळाल्या याविषयी बोलताना मुख्यमंत्री शिंदेंनी वक्तव्य केलं आहे. (lok sabha election 2024 bjp is a united party but shiv sena is a divided party so we got less seats big statement of cm eknath shinde)
ADVERTISEMENT
'भाजप हा फुटलेला पक्ष नाही. भाजप एकसंध आहे. शिवसेना फुटलेली आहे. त्यामुळे साहजिक आहे.. काही जागा इकडे-तिकडे होतात.' असं विधान एकनाथ शिंदेंनी यावेळी केलं आहे. आता एकनाथ शिंदेंच्या या विधानावर आता वेगवेगळ्या चर्चा ही सुरू झाल्या आहेत.
'भाजप हा फुटलेला पक्ष नाही, शिवसेना फुटलेली आहे..', पाहा शिंदे नेमकं काय म्हणाले..
प्रश्न: लोकसभा निवडणुकीत तुम्हाला 15 जागा मिळाल्या.. अनेकांना वाटलं नव्हतं की, एवढ्या जागा तुम्हाला मिळतील. जागा वाटप हे किती कठीण होतं?
हे वाचलं का?
एकनाथ शिंदे: कसं असतं.. तीन पक्ष आहेत.. कार्यकर्त्यांची भावना असते की, ही जागा आपल्याला मिळाली पाहिजे.. शेवटी बघा यात काही समीकरणं असतात, गणितं असतात.. एकदा महायुतीने निर्णय घेतला की, सगळ्या कुजबूज आणि कुरबुरी बंद होतात.
प्रश्न: तुमचे नेते म्हणतात की, भाजपला पूर्वी 25 जागा मिळायच्या पण आता त्यांनी 28 करून घेतल्या. पण शिवसेनेच्या जागा 20 वरून 15 झाल्या.
ADVERTISEMENT
एकनाथ शिंदे: माझे नेते माझ्यासोबत आहेत मी त्यांच्याशी सल्ला-मसलत करत असतो. चर्चा होत असते.. भाजप हा फुटलेला पक्ष नाही. भाजप एकसंध आहे. शिवसेना फुटलेली आहे. त्यामुळे साहजिक आहे.. काही जागा इकडे-तिकडे होतात. महायुती आहे.. मित्रपक्ष आहे. आपल्याला महायुती म्हणून लढायचं आहे. त्यामुळे मला वाटतं की, 15 जागा मिळाल्या आहेत त्यावर आमचे सगळे लोकं समाधानी आहेत. ज्या जागा मिळाल्या आहेत त्यावर आम्ही जिंकणार आहोत.
असं एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले. दरम्यान एकनाथ शिंदेंच्या याच विधानाबाबत आता शिवसेना (UBT)नेते नेमकी काय प्रतिक्रिया देतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT