इंस्टाग्रामवर जुळले सूत... पण, काही काळानंतर ब्रेकअप! संतापलेल्या प्रेयसीचं प्रियकरासोबत भयंकर कृत्य

मुंबई तक

ब्रेकअप झाल्याच्या रागात प्रेयसीने आपल्या प्रियकराची चाकूने वार करून हत्या केल्याचं वृत्त समोर आलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मृत तरुण आणि आरोपी तरुणीची इंस्टाग्रामवर एकमेकांशी ओळख झाली होती.

ADVERTISEMENT

संतापलेल्या प्रेयसीचं प्रियकरासोबत भयंकर कृत्य
संतापलेल्या प्रेयसीचं प्रियकरासोबत भयंकर कृत्य
social share
google news

बातम्या हायलाइट

point

इंस्टाग्रामवर झाली मैत्री आणि प्रेमसंबंध...

point

पण ब्रेकअप झाल्यानंतर प्रेयसीचं प्रियकरासोबत भयंकर कृत्य

Crime News: छत्तीसगडच्या बिलासपूर शहरातून एक खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. ब्रेकअप झाल्याच्या रागात प्रेयसीने आपल्या प्रियकराची चाकूने वार करून हत्या केल्याचं वृत्त समोर आलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मृत तरुण आणि आरोपी तरुणीची इंस्टाग्रामवर एकमेकांशी ओळख झाली होती. कालांतराने, त्यांचे प्रेमसंबंध सुरू झाले. मात्र, काही काळानंतर कोणत्या तरी कारणावरून त्यांचा ब्रेकअप झाला आणि याच रागात आरोपी तरुणीने तिच्या प्रियकराच्या छातीवर चाकूने वार करून त्याची निर्घृण हत्या केली. संबंधित घटना सिव्हिल लाइन पोलीस स्टेशनमध्ये घडली असून या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. 

इंस्टाग्रामवर सूत जुळले अन्... 

वृत्तानुसार, सहा महिन्यांपूर्वी 22 वर्षीय रोशनी नावाच्या तरुणीची आणि 25 वर्षीय कामता प्रसाद सूर्यवंशी नावाच्या तरुणाशी इंस्टाग्रामवर ओळख झाली. त्यानंतर, त्यांच्यात दररोज बोलणं सुरू झालं आणि त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले. मात्र, काही काळानंतर रोशनीच्या प्रियकराने स्वतःला तिच्यापासून दूर करण्यास सुरूवात केली. त्याने तिच्याशी बोलणं बंद केलं आणि कॉल तसेच सोशल मीडियावर प्लॅटफॉर्मही तिला ब्लॉक केलं. यामुळे कामताने रोशनीला सोडून दुसऱ्या मुलीशी मैत्री केली असल्याचा आरोपी तरुणीला संशय आला. 

प्रियकराच्या छातीवर चाकूने वार 

त्यानंतर, मंगळावारी सकाळच्या सुमारास रोशनी चाकू घेऊन कामता प्रसादच्या घरी पोहोचली. त्यावेळी, दोघांमध्ये काही वेळ वाद झाला आणि रागाच्या भरात रोशनीने तिच्या प्रियकराच्या छातीवर गंभीर वार केले. यामध्ये गंभीररित्या जखमी झालेल्या तरुणाला रुग्णालयात नेण्यात आलं, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली. 

हे ही वाचा: पुणे: मैत्रिणीला फोन करण्यावरून वाद... जिवलग मित्रावरच कोयत्याने प्राणघातक हल्ला, CCTV फुटेज समोर

घटनेची माहिती मिळताच सिव्हिल लाईन्स पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी प्रकरणाचा तपास सुरू केला. पोलिसांनी आरोपी रोशनीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून तिला अटक केल्याची माहिती आहे. प्राथमिक तपासात असं दिसून आलं की रोशनी तिच्या प्रियकराला मारण्याच्या उद्देशाने चाकू घेऊन आली होती. पोलीस आता मोबाईल कॉल डिटेल्स आणि सोशल मीडिया चॅट्स तपासत आहेत. लवकरच, हे प्रकरण उघडकीस येणार असल्याची माहिती आहे. 

हे वाचलं का?

    follow whatsapp