नागपुरात अजितदादांच्या पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजीचा सूर, उमेदवारी न दिल्याने थेट ऑफिस फोडलं

NCP Ajit Pawar : नागपुरात राष्ट्रवादीच्या इच्छूक उमेदवारांना तिकीट न दिल्याने पदाधिकाऱ्यांनी आपल्याच पक्षातील उमेदवारांनी आपल्याच पक्षाच्या स्थानिक कार्यालयांची तोडफोड केली.

NCP Ajit Pawar

NCP Ajit Pawar

योगेश पांडे

30 Dec 2025 (अपडेटेड: 30 Dec 2025, 03:33 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

तिकीट न मिळाल्याच्या रागातून कार्यालयाची तोडफोड 

point

नागपुरात राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजीचा सूर 

NCP Ajit Pawar : राज्यात महापालिका निवडणुकीची धामधूम सुरु आहे. अशातच आज दि : 30 डिसेंबर रोजी उमेदवारीचा अर्ज दाखल करण्याचा अंतिम दिवस आहे. अशातच प्रत्येक युतीत-आघाडीत नाराजीचा सूर आहे. आपलेच पदाधिकारी आपल्याच पक्षावर उमेदवारी न दिल्याने नाराज आहेत. याच नाराजीतून त्यांनी आपल्या पक्षाच्या स्थानिक कार्यालयांची तोडफोड केली आहे. नागपुरातील गणेशपेठ येथे देखील अशीच घटना घडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी कार्यालय फोडले आहे.

हे वाचलं का?

हे ही वाचा :  आदित्य ठाकरेंच्या वरळी मतदारसंघात अंतर्गत असंतोषाचा भडका, इच्छुकांची अन् उमेदवारांचीही डोकेदुखी वाढली

तिकीट न मिळाल्याच्या रागातून कार्यालयाची तोडफोड 

घडलेल्या घटनेनुसार, तिकीट न मिळाल्याच्या रागातून काही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी-पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादीच्या कार्यालयाची तोडफोड केली आहे. गणेश पेठ येथील राष्ट्रवादी नागपूर शहर ग्रामीण कार्यालयातील ही घटना असल्याचं सांगण्यात येत आहे. या घटनेनं नागपुरातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील अंतर्गत कलह हा आता चव्हाट्यावर आला आहे.

पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजीचा सूर 

भाजपासोबत युती न झाल्याने राष्ट्रवादीने स्वबळावर लढण्याचा नारा दिला आणि कालपासून एबी फॉर्म वाटप सुरू करण्यात आले. मात्र, ज्या इच्छूक उमेदवारांना उमेदावारी मिळाली नाही अशा पदाधिकाऱ्यांची नाराजी आता उफाळून येताना पाहायला मिळत आहे.

हे ही वाचा : काही राशीतील लोकांना खरं प्रेम मिळणार, तर काही नोकरदारांच्या पगारात भरभराट होणार

केवळ राष्ट्रवादीच नाहीतर शिवसेना, उद्धव ठाकरेंची शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) काही प्रमाणात भाजपच्या काही इच्छूक उमेदवारांनी देखील आपापल्या पक्षाविरोधात पक्षाच्याच स्थानिक कार्यालयात गोंधळ घातल्याचं चित्र दिसून आलं.

    follow whatsapp