Ajit Pawar Reply Rohit Pawar : बारामती लोकसभा मतदार संघात आमदार रोहित पवार यांनी पैसे वाटप केल्याचा आरोप केला आहे. या संबंधित व्हिडिओ देखील रोहित पवार यांनी एक्स या सोशल मीडियावर शेअर केले होते. या सर्व प्रकारावर आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. रोहित पवार (Rohit Pawar) सोशल मीडियावर इतका पोहोचलेला आहे की तो काही दाखवायला कमी करणार नाही. त्यामुळे त्याला काही उद्योग नाही, अशी टीका अजित पवारांनी (Ajit Pawar) रोहित पवारांवर केली. (ajit pawar reply rohit pawar allegation on money distribute baramati loksabha election 2024 sunetra pawar supriya sule)
ADVERTISEMENT
अजित पवार माध्यमांशी बोलत होते. यावेळी पैसै वाटपावर बोलताना अजित पवार म्हणाले की, रोहित पवारची सोशल मीडियावर उत्तम टीम आहे. सोशल मीडियामध्ये त्याला फार इटरेंस्ट आहे. अलिकडच्या काळातला तो असल्याने त्याला सोशल मीडियाचा वापर कळतो. तसेच सोशल मीडियावर तो इतका पोहोचलेला आहे की तो वेगळ काही दाखवून हे कालच आणि पर्वाचचं आहे. हे दाखवायलाही कमी करणार नाही. त्यामुळे त्याला काही उद्योग नाही, असे अजित पवार म्हणाले आहेत.
हे ही वाचा : मतदान केंद्रावर तुंबळ हाणामारी, ठाकरेंच्या शिवसैनिकाची हत्या
रोहित पवारांनी बँकेतून पैसे वाटप केल्याचाही आरोप केला होता. या आरोपावर बोलताना अजित पवार म्हणाले की, तो जो आरोप करतो, त्याप्रमाणे बँकेत सीसीटीव्ही कँमेरे असतात. त्यामुळे बँकेचे सीसीटीव्ही तपासावेत. बँक तेव्हा उघडी होती का? कोण त्या बँकेत आलं होतं आणि बँकेत काय घडलं? हे स्पष्ट होईल. तसेच या प्रकाराची निवडणूक आयोग आणि पोलिसांमार्फत याची चौकशी करावी, अशी मागणी अजित पवारांनी केली आहे.
हे ही वाचा : Narendra Modi : 'काँग्रेस कसाबची बाजू घेतेय, हा शहिदांचा अपमान'
सुप्रिया सुळेंच्या आईंना भेटीचा मतदारांवर काय परिणाम होणार? असा सवाल पत्रकारांनी विचारला होता.यावर अजित पवार म्हणाले, बारामतीचे मतदार कुणी भांडल आणि भेटलं त्याच्यावर मतदान करत नसतात. ते खूप विचाराने मतदान करत असतात. माझा जो अनुभव आहे, त्याप्रमाणे ते त्यांच्या सद्सद् विविकेबुद्धीला स्मरून मतदान करतात.
ADVERTISEMENT
