अमेरिका अन् आपल्या वेळेत अंतर, उद्यापर्यंत एपस्टीन फाईलमधील भारतीयांचे नावे येतील, पृथ्वीराज चव्हाणांचे सनसनाटी दावे

Prithviraj Chavan making sensational claims about Epstein files : पुढे बोलताना पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितलं की, आता हळूहळू सर्व गोष्टी समोर येत आहेत आणि त्यांच्या विधानाला पुष्टी मिळत आहे. त्यांच्या मते, 19 तारखेला अमेरिकेत एपस्टीन फाईलमधील महत्त्वाची माहिती उघड केली जाणार आहे. मात्र, अमेरिका आणि भारतातील वेळेच्या फरकामुळे ही माहिती भारतात 20 तारखेला समोर येईल.

Prithviraj Chavan making sensational claims about Epstein files

Prithviraj Chavan making sensational claims about Epstein files

मुंबई तक

19 Dec 2025 (अपडेटेड: 19 Dec 2025, 04:41 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

"अमेरिका अन् आपल्या वेळेत अंतर, उद्यापर्यंत एपस्टीन फाईलमधील भारतीयांचे नावे येतील"

point

पृथ्वीराज चव्हाणांचे सनसनाटी दावे

Prithviraj Chavan making sensational claims about Epstein files : काही दिवसांपूर्वी एपस्टीन फाईल्स संदर्भात केलेल्या वक्तव्यावरून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना टीकेला सामोरे जावे लागत होते. दरम्यान, आता एपस्टीन फाईल्स समोर आल्याने संपूर्ण जगभरात खळबळ उडाली आहे. बिल गेट्स यांच्यापासून दिग्गज लोकांचे फोटो आणि चॅट्स यातून समोर आले आहेत. त्यानंतर पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली असून त्यांनी उद्यापर्यंत त्या फाईलमधून भारतीयांचे नावे समोर येतील, असा सनसनाटी दावा पृथ्वीराज चव्हाण यांनी केलाय. ते कराड येथे पत्रकारांशी बोलत होते.

हे वाचलं का?

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, अमेरिकेतील प्रमुख वर्तमानपत्रांमध्ये प्रसिद्ध झालेल्या माहितीनुसार आपण हे प्रकरण आधीच मांडलं होतं. एपस्टीन फाईलबाबत मी अमेरिकेतील वर्तमानपत्र वाचूनच ही माहिती मांडली होती. मी किडेमोडे ज्योतिषी म्हणून नाही, तर उपलब्ध तथ्यांच्या आधारे मी बोललो होतो. मात्र, त्या वेळी त्यांच्या या विधानावर मोठ्या प्रमाणावर टीका झाली होती. “म्हातारपणी चाळे लागले आहेत” अशा शब्दांत माझ्यावर हल्ले झाले, असंही चव्हाण यांनी नमूद केलं.

हेही वाचा : 18 वर्षीय रशियन मुलीचा सौदा, महिलांच्या अंगावर मजकूर, पाहा एपस्टीन फाइल्समधील 3 खळबळजनक फोटो

पुढे बोलताना पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितलं की, आता हळूहळू सर्व गोष्टी समोर येत आहेत आणि त्यांच्या विधानाला पुष्टी मिळत आहे. त्यांच्या मते, 19 तारखेला अमेरिकेत एपस्टीन फाईलमधील महत्त्वाची माहिती उघड केली जाणार आहे. मात्र, अमेरिका आणि भारतातील वेळेच्या फरकामुळे ही माहिती भारतात 20 तारखेला समोर येईल.

या फाईलमध्ये काही भारतीयांचीही नावं असल्याचा दावा करत पृथ्वीराज चव्हाण यांनी खळबळजनक वक्तव्य केलं. “या प्रकरणात काही भारतीयांची नावं आहेत. माझ्या आधीच ती नावं तुम्हाला कळतील,” अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

एपस्टीन प्रकरण आंतरराष्ट्रीय स्तरावर आधीपासूनच संवेदनशील मानलं जात असून, प्रभावशाली व्यक्तींशी संबंधित आरोपांमुळे हे प्रकरण अधिकच गंभीर बनलं आहे. आता या फाईलमधून नेमकी कोणती माहिती बाहेर येते आणि त्यात कोणकोणाची नावं समोर येतात, याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. पृथ्वीराज चव्हाण यांच्या या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा एपस्टीन फाईलचा मुद्दा चर्चेच्या केंद्रस्थानी आला असून, पुढील काही दिवसांत होणाऱ्या खुलास्यांमुळे राजकीय वातावरण तापण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

अमेरिकेच्या हाउस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह्जमधील डेमोक्रॅट सदस्यांनी गुरुवारी लैंगिक गुन्ह्यांत दोषी ठरलेल्या जेफ्री एपस्टीनच्या मालमत्तेतून मिळालेले 68 नवे फोटो सार्वजनिक केले आहेत. या छायाचित्रांमागील मुख्य हेतू म्हणजे एपस्टीनचे विविध प्रभावशाली व्यक्तींशी असलेले संबंध उघडकीस आणणे. सांगण्यात येते की, 2019 मध्ये हाउस ओव्हरसाइट कमिटीला एपस्टीनच्या तुरुंगातील मृत्यूपूर्वी जप्त करण्यात आलेल्या तब्बल 95 हजार फोटोंच्या संग्रहातून ही छायाचित्रे प्राप्त झाली होती.

डेमोक्रॅट्सनी जाहीर केलेल्या या फोटोंमध्ये एपस्टीन अनेक श्रीमंत आणि प्रभावशाली व्यक्तींना सोबत घेऊन विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी झाल्याचे दिसते. या छायाचित्रांमध्ये मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक बिल गेट्स, प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक वुडी अ‍ॅलन, गुगलचे सह-संस्थापक सर्जी ब्रिन, विचारवंत नोम चॉम्स्की तसेच माजी ट्रम्प प्रशासनातील सल्लागार स्टीव्ह बॅनन यांच्यासह अनेक नामांकित व्यक्तींचा समावेश आहे. काही फोटोंमध्ये बिल गेट्स महिलांसोबत दिसत असल्याचेही स्पष्ट होते.

या संग्रहात काही अत्यंत धक्कादायक छायाचित्रांचाही समावेश आहे. काही फोटोंमध्ये रशियन लेखक व्लादिमीर नाबोकोव्ह यांच्या ‘लोलिटा’ या कादंबरीतील उतारे एका महिलेच्या शरीराच्या विविध भागांवर लिहिलेले आढळतात. एका अस्पष्ट छायाचित्रात महिलेच्या छातीवर कादंबरीच्या सुरुवातीच्या ओळी दिसतात, तर दुसऱ्या फोटोत तिच्या पायावर ‘लोलिटा’मधील मजकूर लिहिलेला असून मागे त्या पुस्तकाची प्रत ठेवलेली दिसते. संभाव्य पीडितांची ओळख लपवण्यासाठी या छायाचित्रांमधील चेहऱ्यांवर ब्लर करण्यात आला आहे. या छायाचित्रांचा खुलासा राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मंजूर केलेल्या कायद्यानंतर झाला आहे. या कायद्यानुसार न्याय विभागाला एपस्टीन आणि घिस्लेन मॅक्सवेल यांच्याशी संबंधित सर्व कागदपत्रे शुक्रवारपर्यंत सार्वजनिक करण्याचे आदेश देण्यात आले होते.

यापूर्वी प्रसिद्ध झालेल्या फोटोंमध्ये माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, बिल क्लिंटन तसेच ब्रिटनचे प्रिन्स अँड्र्यू यांचाही समावेश होता. एपस्टीनशी असलेल्या संबंधांमुळे प्रिन्स अँड्र्यू यांना याच वर्षाच्या सुरुवातीला शाही पदव्या गमवाव्या लागल्या होत्या. जसजशा नव्या फाईल्स समोर येत आहेत, तसतशी अनेक मोठ्या व्यक्तींची अडचण वाढताना दिसून येत आहे.

जेफ्री एपस्टीन कोण होता?

जेफ्री एपस्टीन हा न्यूयॉर्कमध्ये राहणारा अमेरिकन अब्जाधीश वित्तीय गुंतवणूकदार होता. प्रचंड संपत्ती आणि जगभरातील राजकीय नेते, उद्योगजगतातील दिग्गज तसेच हॉलीवूडमधील नामांकित सेलिब्रिटींसोबत असलेल्या जवळच्या संबंधांमुळे तो ओळखला जात होता. 2005 साली त्याच्यावर एका अल्पवयीन मुलीच्या लैंगिक शोषणाचा आरोप करण्यात आला होता. त्यानंतर 2008 मध्ये अल्पवयीन मुलींशी लैंगिक संबंध ठेवण्याची मागणी केल्याप्रकरणी तो दोषी ठरला आणि त्याला केवळ 13 महिन्यांचा तुरुंगवास झाला.

पुढे 2019 मध्ये अल्पवयीन मुलींच्या लैंगिक तस्करीसारख्या गंभीर आरोपांखाली त्याला पुन्हा अटक करण्यात आली. मात्र खटल्याची सुनावणी सुरू होण्यापूर्वीच न्यूयॉर्कच्या तुरुंगात त्याचा संशयास्पद मृत्यू झाला. अधिकृत तपास अहवालानुसार त्याने आत्महत्या केल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, एपस्टीनची दीर्घकाळची सहकारी घिस्लेन मॅक्सवेल हिला 2021 मध्ये या गुन्ह्यांमध्ये मदत केल्याप्रकरणी दोषी ठरवण्यात आले असून, न्यायालयाने तिला 20 वर्षांची शिक्षा सुनावली आहे. सध्या ती तुरुंगात शिक्षा भोगत आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

मुंबई : दीरासमोर विवाहितेने गळफास घेतला, बॉडी नग्न अवस्थेत सापडली; चॅटींगमधून अनैतिक संबंध समोर
 

 

    follow whatsapp