मुंबई: महाराष्ट्राचे मंत्री माणिकराव कोकाटे यांनी अखेर आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे सादर केला आहे. नाशिकच्या स्थानिक आणि जिल्हा न्यायालयाने सदनिका घोटाळ्यात माणिकराव यांना दोषी ठरवलं होतं. ज्यानंतर त्यांना 2 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. या सगळ्या कारवाईनंतर माणिकराव कोकाटे यांनी आज (18 डिसेंबर) अजित पवार यांच्याकडे राजीनामा सोपवला. ज्यानंतर अजित पवारांनी माणिकराव कोकाटेंचा राजीनामा मंजुरीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सोपवला आहे.
ADVERTISEMENT
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा
अजित पवारांनी माणिकराव कोकाटेंचा राजीनामा मंजुरीसाठी मुख्यमंत्र्यांकडे पाठवला
कोकाटेंच्या राजीनाम्याआधीच मुख्यमंत्र्यांनी काढून घेतलेली सर्व खाती
माणिकराव कोकाटे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा देण्याआधीच स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालांकडे शिफारस करत कोकाटे यांच्याकडील खाती काढून घेतली होती. त्यामुळे कालपासून (17 डिसेंबर) माणिकराव कोकाटे हे बिनखात्याचे मंत्री राहिले होते. त्यांच्याकडे असणारी खाती ही उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांच्याकडे सोपविण्यात आली आहेत.
माणिकराव कोकाटे यांना कोणत्या प्रकरणात झालीए शिक्षा?
माणिकराव कोकाटे हे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे वरिष्ठ नेते असून, सध्या महायुती सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री आहेत. सुरुवातीला त्यांच्याकडे कृषी खातं होतं. मात्र, विधानसभेत मोबाइलवर रमी खेळत असल्याच्या वादातून त्यांना कृषी खातं गमवावं लागलं होतं. त्यानंतर त्यांना क्रीडा खातं देण्यात आलं होतं. दुसरीकडे त्यांच्यावर नाशिक जिल्ह्यातील सदनिका फसवणूक प्रकरणी कोर्टाने शिक्षा कायम ठेवली. त्यामुळे आता त्यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे.
ADVERTISEMENT











