अनावधानाने माझ्याकडून चुकीचा उल्लेख झाला, अजितदादांच्या अपघाताची वेळेबाबत राजेश टोपेंचं स्पष्टीकरण

Rajesh Tope on Ajit Pawar Death : राजेश टोपे यांनी फेसबुक पोस्ट करत याबाबत महत्त्वाचं स्पष्टीकरण दिलंय. राजेश टोपे म्हणाले, "मा.अजितदादा यांचे अपघाती निधन हा आम्हा सर्वांसाठी खूप तीव्र धक्का होता. या दुःखद प्रसंगी प्रसारमाध्यमांशी बोलताना बातमी समजल्याच्या वेळेबाबत अनावधानाने माझ्याकडून चुकीचा उल्लेख झाला. कृपया, या कठीण व संवेदनशिल काळात ही बाब समजून घ्यावी, ही विनंती"

Rajesh Tope on Ajit Pawar Death

Rajesh Tope on Ajit Pawar Death

मुंबई तक

05 Feb 2026 (अपडेटेड: 05 Feb 2026, 11:57 AM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

अनावधानाने माझ्याकडून चुकीचा उल्लेख झाला

point

अजितदादांच्या अपघाताची वेळेबाबत राजेश टोपेंचं स्पष्टीकरण

Rajesh Tope on Ajit Pawar Death : मुंबई : महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा 28 जानेवारी रोजी बारामती येथे झालेल्या विमान अपघातात मृत्यू झालाय. त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात हळहळ व्यक्त होत आहे. अजूनही महाराष्ट्र या धक्क्यातून सावरलेला नाही. दरम्यान, या दुःखद घटनेनंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना निधनाची बातमी समजल्याच्या वेळेबाबत आपल्याकडून अनावधानाने चुकीचा उल्लेख झाल्याचे माजी मंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केले आहे.

हे वाचलं का?

हेही वाचा : 12 वीच्या विद्यार्थ्याकडून शिक्षिकेचा विनयभंग! नेहमीच्या त्रासाला कंटाळून शाळा सोडली, पण शेवटी वाटेत अडवून भयंकर कृत्य

राजेश टोपे यांनी फेसबुक पोस्ट करत याबाबत महत्त्वाचं स्पष्टीकरण दिलंय. राजेश टोपे म्हणाले, "मा.अजितदादा यांचे अपघाती निधन हा आम्हा सर्वांसाठी खूप तीव्र धक्का होता. या दुःखद प्रसंगी प्रसारमाध्यमांशी बोलताना बातमी समजल्याच्या वेळेबाबत अनावधानाने माझ्याकडून चुकीचा उल्लेख झाला. कृपया, या कठीण व संवेदनशिल काळात ही बाब समजून घ्यावी, ही विनंती"

दरम्यान, अजित पवार यांच्या निधनाने राजकीय, सामाजिक तसेच सर्वसामान्य जनतेमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण करत त्यांच्या कार्याची आठवण करून दिली आहे. या पार्श्वभूमीवर राजेश टोपे यांच्या स्पष्टीकरणाकडेही संवेदनशीलतेने पाहिले जात असून, दुःखाच्या प्रसंगी संयम राखण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

संजय राऊत, ममता बॅनर्जी अन् मिटकरींनी व्यक्त केली घातपाताची शंका 

अजित पवारांच्या अपघाती मृत्यू नसून त्यांचा घातपात झाल्याची शंका पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी व्यक्त केली होती. त्यानंतर खासदार शरद पवारांनी हा अपघातच असल्याचा दावा केला. मात्र, त्यानंतर राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी देखील अजितदादांचा घातपात झाल्याची शंका असल्याचं बोलून दाखवलं. शिवाय, ब्लॅक बॉक्समधील माहिती लवकरात लवकर सार्वजनिक करण्यात यावी आणि मुंबई विमानतळावर सीसीटीव्ही फुटेज देखील समोर यावं, अशी मागणी देखील त्यांनी केली आहे. 

दरम्यान, अजित पवार यांच्याकडे भाजपच्या भ्रष्टाचाराची फाईल होती. 10 दिवसांपूर्वी त्यांनी याबाबत बोलून दाखवलं होतं. मात्र, भाजपच्या भ्रष्टाचाराबाबत बोलताच दहा दिवसांनी त्यांचा मृत्यू झालाय, असा संशय देखील संजय राऊत यांनी व्यक्त केलाय.

इतर महत्त्वाच्या बातम्या 


12 वीच्या विद्यार्थ्याकडून शिक्षिकेचा विनयभंग! नेहमीच्या त्रासाला कंटाळून शाळा सोडली, पण शेवटी वाटेत अडवून भयंकर कृत्य

    follow whatsapp