Gautami Patil on Ajit Pawar Death : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं 28 जानेवारी रोजी झालेल्या विमान अपघातात निधन झाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेला मोठा धक्का बसला. अनेक जण अजूनही यातून सावरलेले नाहीत. सोशल मीडियावर आजही लोकं अजितदादांच्या आठवणी सांगताना पाहायला मिळत आहेत. दरम्यान, नृत्यांगणा गौतमी पाटील हिने देखील तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत.
ADVERTISEMENT
अजित पवार यांनी काही वेळेस त्यांच्या भाषणात गौतमी पाटीलचा उल्लेख देखील केला होता. काही पत्रकारांनी देखील गौतमी पाटीलबाबत अजितदादांना प्रश्न विचारला होता. कला क्षेत्रातील लोकांना मदत करणारे नेते म्हणून देखील अजित पवार यांची ओळख होती. दरम्यान, अजितदादांच्या जाण्याने गौतमी पाटीललाही धक्का बसला. तिने Abhijat Marathi OTT ला दिलेल्या मुलाखतीत भावना व्यक्त केल्या. ती काय म्हणाली? सविस्तर जाणून घेऊयात...
महाराष्ट्र कधीच दादांना विसरणार नाही, ते महाराष्ट्राचे लाडके होते - गौतमी पाटील
गौतमी पाटील म्हणाली, मी एकदम शॉक होते, हे काय झालं? मला आईने घटनेची माहिती दिली. मी तिला म्हटलं ..हे काय बोलतेय?.. मात्र, ज्यावेळेस मी न्यूज पाहिली त्यावेळी विश्वासच बसत नव्हता. मला बोलायला शब्द नाहीत. दादांच्या बाबतीत असं घडलंय याचा अजूनही विश्वास बसत नाही. मी दादांना कधी भेटले नाही. मात्र, दादांनी मला सपोर्ट पण केला. म्हणजे ते माझ्याबाबतीत जे बोलले. स्टेटमेंट दिले. ते माझ्यासाठी खूप होतं. दादा महाराष्ट्राचे लाडके नेते होते. जे काही झालं ते चुकीचं झालं. मी अजूनही शॉकमध्ये आहे. दादांचा कलाकारांना सपोर्ट असणं खूप महत्त्वाचं होतं. दादांनी प्रत्येक कलाकाराला सपोर्ट दिलाय. त्यांच्याकडे काम घेऊन गेलं की होणार.. 100 टक्के होणार.. आम्ही कधी भेटलो नाहीत. मात्र, दादांनी माझ्याबाबत दोन शब्द बोलले. तिथेच दादांनी माझं मन जिंकल्यासारखं होतं..दादा खरचं खूप छान होते. महाराष्ट्र कधीच त्यांना विसरणार नाही. ते महाराष्ट्राचे लाडके आहेत, आणि कायम असणार आहेत. ते नेहमी एक नंबरलाच असणार आहेत.
इतर महत्त्वाच्या बातम्या
ADVERTISEMENT











