Sharad Pawar on Devendra Fadnavis, बारामती : राष्ट्रवादीचे दिवंगत नेते आणि महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा 28 जानेवारी रोजी बारामती येथील विमान अपघातात मृत्यू झाला. मात्र, अजित पवारांच्या या विमान अपघातात अनेक नेत्यांनी शंका व्यक्त केल्या आहेत. राष्ट्रवादीचे विधानपरिषदेचे आमदार अमोल मिटकरी यांनी घातपाताची शंका व्यक्त करत 5-6 मोठे प्रश्न उपस्थित केले आहेत. शिवाय ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राज्यसभेत अजितदादांच्या अपघाती मृत्यूची चौकशी करण्याची मागणी केलीये. दरम्यान, या सर्व घडामोडींवर खासदार शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिलीये.
ADVERTISEMENT
जोपर्यंत ऑथेंटिक माहिती नाही, तोपर्यंत मी शंका घेणार नाही - शरद पवार
अजित पवारांच्या अपघाताबाबत सर्वत्र शंका उपस्थित केल्या जात असताना शरद पवारांनी पुन्हा एकदा यावर भाष्य केलंय. ते म्हणाले, अजित पवारांच्या अपघाताबाबत मी सुरुवातीलाच बोललोय. पुन्हा काय सांगायचं? जोपर्यंत ऑथेंटिक माहिती नाही, तोपर्यंत मी शंका घेणार नाही, असंही शरद पवारांनी स्पष्ट केलं.
अजित पवारांचा अपघाती मृत्यू झाला. त्यादिवशी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी अजित पवारांचा घातपात झाल्याची शंका व्यक्त केली होती. मात्र, शरद पवारांनी हा अपघातचं असल्याचं स्पष्ट केलं होतं. त्यानंतर अमोल मिटकरी आणि संजय राऊतांनी देखील या प्रकरणात मोठ्या शंका उपस्थित केल्या होत्या. धुकं नव्हतं, पायलट का बदलला? मुंबईत अजित पवारांनी प्रवासाला सुरुवात केली त्यावेळीचं सीसीटीव्ही का मिळत नाही? असे अनेक प्रश्न अमोल मिटकरांनी उपस्थित केले आहेत.
देशाच्या बजेटबाबत शरद पवारांची प्रतिक्रिया
पुढे बोलताना शरद पवार म्हणाले, मी महाराष्ट्राची विधानसभा, देशाची लोकसभा आणि राज्यसभा या सर्व संस्थांमध्ये गेली 58 वर्ष सभासद आहे. या 58 वर्षांमध्ये अंदाजपत्रक ज्यादिवशी असेल त्यादिवशी माझी गैरहजेरी कधीही झाली नव्हती. पण दुर्देवाने हा आघात झाला (अजित पवारांचा मृत्यू) त्यामुळे मी दिल्लीला जाऊ शकलो नाही. त्यामुळे सभागृहात जाऊन अंदाजपत्रक ऐकणं, ही संधी मला यावेळेस मिळाली नाही. मात्र, जे वाचलं त्याच्यामध्ये दोन-तीन गोष्टी दिसतात. सामान्य माणसाला यातना होतील, अशा प्रकारच्या गोष्टी जाणीवपूर्वक टाळलेल्या आहेत, ही एका प्रकारे समाधानाची गोष्ट आहे. पण या अंदाजपत्रकामधून विकासाच्या दृष्टीने ठोस पाऊलांची गरज होती.
इतर महत्त्वाच्या बातम्या
ADVERTISEMENT











