Cockroach janta party X account : 'बेरोजगार तरुण कॉकरोच बनून व्यवस्थेवर हल्ला करतात", असं वक्तव्य भारताचे सरन्यायाधीश (CJI) सूर्यकांत यांनी केलं होतं. त्यानंतर त्यांच्या वक्तव्याला विरोध करण्यासाठी एका मराठी तरुणाने सोशल मीडियावर 'कॉकरोच जनता पार्टी' या व्यंगात्मक एक्स (ट्विटर) हँडल सुरु झाले होते. मात्र, 'कॉकरोच जनता पार्टी' या एक्स (ट्विटर) हँडलवर केंद्र सरकारने मोठी कारवाई केली आहे. "इंटेलिजन्स ब्युरोने (IB) हा राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने चिंतेचा विषय असल्याचे सांगण्यात आल्यानंतर ही कारवाई झाली", असं एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितलंय. याबाबतचं वृत्त इंडियन एक्सप्रेसने दिलंय.
ADVERTISEMENT
हेही वाचा : Maharashtra Weather : राज्यात हवामान बदलाचे वारे, 'या' जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट
"देशाच्या राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण होऊ शकत होता"
माहिती तंत्रज्ञान कायदा, 2000 च्या कलम 69 (A) अंतर्गत कॉकरोज जनता पार्टीचे एक्स हँडल ब्लॉक करण्यास सांगितले असून, हे आदेश एका गोपनीय चौकटीत जारी केले जात असल्याने अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर ही माहिती दिली. आयबीच्या मते, हे खाते प्रक्षोभक मजकूर पोस्ट करत होते, ज्यामुळे देशाच्या राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण होऊ शकत होता आणि तरुणांमध्ये या खात्याचा वाढता प्रभाव ही मुख्य चिंतेची बाब ठरली होती.
हेही वाचा : उल्हासनगर : भररस्त्यात थरारक गोळीबार, सात राऊंड फायर; किती जणांचा गेला जीव?
माहिती तंत्रज्ञान कायद्याचे कलम 69 (A) केंद्र सरकारला देशाची सार्वभौमत्व, सार्वजनिक सुव्यवस्थेला धोक्यात आणणारी चिथावणी देण्यापासून रोखण्यास निर्बंध घालण्याचा अधिकार देते. ही संपूर्ण प्रक्रिया माहिती तंत्रज्ञान नियम, 2009 च्या अंतर्गत चालविली जाते आणि ब्लॉक करण्याचे हे आदेश गोपनीय असतात. हे खाते सध्या भारतात ब्लॉक करण्यात आले असले तरी इतर देशांमध्ये ते पाहाता येत आहे. गुरुवार संध्याकाळपर्यंत त्याचे 2 लाखांहून अधिक फॉलोअर्स होते.
एका दुसऱ्या अधिकाऱ्याने सांगितले की, जेव्हा या खात्याचे साधारण 90 हजार फॉलोअर्स होते, तेव्हाच हे आदेश पाठवण्यात आले होते. या चळवळीशी संबंधित इन्स्टाग्राम हँडल अद्याप भारतात ब्लॉक केलेले नाही आणि गुरुवारपर्यंत त्याचे 16 दशलक्षहून अधिक फॉलोअर्स होते, परंतु ते खाते देखील ब्लॉक करण्याची प्रक्रिया सध्या सुरू असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्याने स्पष्ट केले.
'कॉकरोच इज बॅक' म्हणत अभिजीत दीपकेने सुरू केले नवीन हँडल
या कारवाईनंतर कॉकरोच जनता पार्टीचा संस्थापक अभिजीत दीपके म्हणाले, "अपेक्षेप्रमाणे, कॉकरोच जनता पार्टीचे खाते भारतात ब्लॉक करण्यात आले आहे." त्यानंतर दोन तासांच्या आत त्याने 'कॉकरोच इज बॅक' (Cockroach Is Back) या नावाने नवीन हँडल सुरु करत लोकांना त्यात सामील होण्याचे आवाहन केले. सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी 15 मे रोजी एका प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान वकिलाला फटकारताना म्हटले होते की, "समाजात आधीच काही परजीवी आहेत जे व्यवस्थेवर हल्ला करतात... बेरोजगार तरुणांसारखे काही कॉकरोच आहेत, जे मीडिया, सोशल मीडिया, आरटीआय कार्यकर्ते बनतात आणि प्रत्येकावर हल्ला करू लागतात." या विधानावरून मोठा गदारोळ झाला होता.
दरम्यान सरन्यायाधीशांनी त्याच्या वक्तव्याबाबत स्पष्टीकरण दिले होते की, त्यांनी तरुणांवर टीका केली नसून बनावट पदव्यांच्या आधारे कायद्याच्या किंवा मीडियाच्या क्षेत्रात घुसलेल्या परजीवी लोकांवर टीका केली होती. मात्र, त्यांच्या या विधानानंतर लगेचच अभिजीत दीपके याने एक्सवर टीका केली आणि दुसऱ्याच दिवशी सर्व "कॉकरोच जनता पार्टीसाठी" एक नवं व्यासपीठ तयार करून ऑनलाइन फॉर्मची लिंक शेअर केली. याला सोशल मीडियावर मोठा प्रतिसाद मिळाला आणि समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव व तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोइत्रा यांसारख्या नेत्यांनीही याला पाठिंबा दिला.
ADVERTISEMENT











