दोन्ही राष्ट्रवादींच्या विलिनीकरणाबद्दल सुप्रिया सुळेंचं मोठं विधान, तातडीने पत्रकार परिषद घेत काय म्हणाल्या?

पृथ्वीराज पाटील

14 Nov 2026 (अपडेटेड: 14 Nov 2026, 11:46 AM)

दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाविषयी सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. याविषयी सुप्रिया सुळे यांनी तातडीची प्रेस कॉन्फरन्स बोलवली. यावेळी त्या काय म्हणाल्या जाणून घ्या.

Supriya Sule

Supriya Sule

Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

सुप्रिया सुळे यांची पत्रकार परिषद

point

विलिनीकरणाबद्दल मोठं विधान

Supriya Sule : 'माझा भाऊ होता तोपर्यंत विलिनीकरणाची चर्चा होती, तारीख ठरली होती हे दोन्ही बाजूच्या सगळ्या नेत्यांनी सांगितलेलं आहे. ज्यादिवशी माझा भाऊ गेला त्यादिवशी विलिनीकरणाबद्दल माझ्या मनात आणि आमच्या पक्षात त्याला पूर्णविराम मिळाला' अशी माहिती खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली. गेल्या काही दिवसांपासून दोन्ही राष्ट्रवादींच्या विलिनीकरणाची चर्चा रंगली आहे. त्याविषयी आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून जी विधानं करण्यात आली आहेत त्या विधानांचा प्रतिवाद आम्ही करणार नाही. हा आमच्यासाठी भावनिक मुद्दा असल्याचंही त्या म्हणाल्या.

हे वाचलं का?

यापुढं बोलताना त्या म्हणाल्या की, 'आम्ही आमचं राजकारण फक्त सेवा म्हणून बघतो. फक्त अंतर्गत एक पक्ष कसा चालेल इथपर्यंत आमचा पक्ष सीमित नाही. आमचा पक्ष लोकसेवेसाठी आहे. धोरणनिर्मितीवर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष दर आठवड्याला बैठक घेतो. आमच्या आठ खासदारांची दर आठवड्याला बैठक होते. हे सगळं टीमवर्क आहे.' तुम्ही आम्हाला निवडून कशासाठी दिलंय? कुठल्या पक्षात काय चाललंय हे करायला का तुमच्या आयुष्यात चांगला बदल घडवण्यासाठी? असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.

विलिनीकरणाबाबत बोलताना त्या म्हणाल्या की आज विलिनीकरणाबाबत बिनधास्त, दिल खोल के सगळी चर्चा करुन टाकू. पुढं बोलताना त्या म्हणाल्या की 'नातं आणि राजकारण अशी गल्लत करु नका. छगन भुजबळ, प्रफुल पटेल, सुनील तटकरे या सर्वांनी माझ्या वडिलांसोबत काम केलंय. त्यांच्यापेक्षा अनुभवाने, वयाने मी फार लहान आहे. माझ्या आईने माझ्यावर जे संस्कार केले की मोठ्या माणसांनी बोलल्यावर काही बोलू नये. सत्ता येते आणि जाते नातीच टिकतात. त्यामुळं ते काय बोलले यावर मी कसं बोलणार?

यापुढं त्या म्हणाल्या की आम्ही विरोधात आहोत. पण आम्ही पन्नास खासदार शंभर देशात जाऊन आलो. आम्ही देशाच्या वतीने गेलो. देशाचा विषय येतो तेव्हा नो कॉम्प्रमाईज. ही वैचारिक लढाई आहे. पुढं त्या म्हणाल्या की 2023 मध्ये जे झालं ते झालं, पण कौटुंबिक संबंध माझ्याकडून कायम जपले जातील असं त्या म्हणाल्या.