शेतकऱ्यांना कर्जमाफी कधी मिळणार? मुख्यमंत्र्यांनी थेट तारीखच सांगितली..

मुंबई तक

• 04:15 PM • 21 May 2026

खरीप हंगामाचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेतली होती. या पत्रकार परिषदेत त्यांनी कर्जमाफीविषयी मोठी घोषणा केली.

Fadnavis on Loan Waiver

Fadnavis on Loan Waiver

Google CTA

बातम्या हायलाइट

point

शेतकऱ्यांना कर्जमाफी कधी मिळणार?

point

मुख्यमंत्र्यांनी थेट तारीखच सांगितली..

Fadnavis on Loan Waiver : खरीप हंगामाचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेतली होती. या पत्रकार परिषदेत त्यांनी कर्जमाफीविषयी मोठी घोषणा केली. 30 जूनपूर्वी कर्जमाफी करण्यात येणार असल्याचे त्यांनी या पत्रकार परिषदेत सांगितले. यावेळी बोलताना ते नेमकं काय म्हणाले जाणून घेऊया.

हे वाचलं का?

खरीपावर अल निनोचं संकट

या पत्रकार परिषदेत बोलताना फडणवीस म्हणाले की, खरीप हंगामावर अल निनोचं मोठं संकट आहे. हवामान विभागातर्फे 88 टक्के पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. काही भागांमध्ये त्याची तीव्रता अधिक असण्याची शक्यता आहे. त्यामुळे हवामानाच्या अंदाजानुसार प्लॅनिंग आहे. जलयुक्त शिवारची कामे वेगाने करण्याचे आदेश देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

हे ही वाचा : शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते विकास लवांडे यांना अटक, फेसबुकवरुन दिली माहिती, कारण काय?

चार निर्णय कोणते?

बियाणांविषयी बोलताना ते म्हणाले की, साथी पोर्टलवर रजिस्टर असलेलं बियाणंच घ्यावं. सध्या उपलब्ध खत 25 लाख मेट्रिक टन आहे. यावेळी त्यांनी चार महत्त्वाच्या निर्णयांविषयी सांगितले.

१. महाविस्तार 2.0 अॅप : 40 लाख लोक वापरतात. हे अॅप शेतकऱ्यांचा कृषीमित्र आहे. यामध्ये एआयचा वापर करुन शेतकऱ्यांना विविध माहिती पुरवली जाणार आहे. पाऊस किती  पडणार याचाही अंदाज कळणार आहे.

२. डिजिटल क्रॉप सर्व्हे : या माध्यमातून आपण आपल्या पिकाचा सर्व्हे करु शकतो. जर नेटवर्क नसेल तर आधी फोटो काढून नंतर नेटवर्क असलेल्या ठिकाणी अपलोड करता येईल.

३. सेंट्रल बँक डिजिटल करन्सी, डिजिटल करन्सी लाँच करण्यात आली

४. निर्यात होणारा माल कुठे उत्पादित झालाय त्यासाठी डिजिटल ट्रेसेबिलिटी उपलब्ध करुन देण्यात आलीये. 

हे ही वाचा : बीड : लेकरांना बसमध्ये सोडून आई प्रियकारसोबत पळाली, चिठ्ठीत भलतंच काहीतरी..

खताचं व्यवस्थापन

यापुढे बोलताना फडणवीस म्हणाले की,  MAHA DBT च्या माध्यमातून 2025-26 मध्ये 91, 649 कोटी वितरित करण्यात आले आहेत. अल निनोमुळे कमी  पाऊस पडणार आहे. तसेच जागतिक परिस्थितीमुळे खतांचं व्यवस्थापन करण्याचं नियोजन करण्यात आलंय. तसेच तीस जूनपूर्वी कर्जमाफी होणार असल्याचं फडणवीसांनी सांगितलं.