बीड : लेकरांना बसमध्ये सोडून आई प्रियकारसोबत पळाली, चिठ्ठीत भलतंच काहीतरी..

मुंबई तक

Beed News : बीडमधून एक लज्जास्पद प्रकार उघडकीस आला आहे. आईच आपल्या मुलांना बसमध्ये सोड़ून प्रियकरासोबत पळून गेली होती. महिलेला तळजापूर-संभाजीनगर बसमध्ये बसवून दिले आणि स्वत: प्रियकरासोबत स्कूटीवर बसून निघून गेली. बसमध्ये मुलं एकटीच रडत बसली होती.

ADVERTISEMENT

Beed News
Beed News
google news

बातम्या हायलाइट

point

मुलांना बसमध्ये सोड़ून आईच प्रियकरासोबत गेली पळून

point

आजोबाची स्कूटी आणि पैशांबाबत चौकशी 

Beed News : रोहिदास हातगाळे - बीडमधून एक लज्जास्पद प्रकार उघडकीस आला आहे. आईच आपल्या मुलांना बसमध्ये सोड़ून प्रियकरासोबत पळून गेली होती. महिलेला तळजापूर-संभाजीनगर बसमध्ये बसवून दिले आणि स्वत: प्रियकरासोबत स्कूटीवर बसून निघून गेली. बसमध्ये मुलं एकटीच रडत बसली होती. कंडक्टरच्या लक्षात येता त्यांनी बीड शिवाजीनगर पोलिसांना या घटनेची माहिती दिली. ही घटना 17 मे 2026 रोजी घडल्याचे वृत्त समोर आले आहे. 

हे ही वाचा : डॉक्टरांनी लेकासाठी मोटेगावकरांकडून पेपर विकत घेतला, CBI ने आवळल्या मुसक्या

मुलांच्या खिशात चिठ्ठी ठेवली

निर्दयी मातेने मुलांच्या खिशात चिठ्ठी ठेवली होती. त्यात आई-वडील नाहीत, यांना यवतमाळकडे पाठवून द्या, असे त्यात लिहिले होते. या चिठ्ठीवर तिने मुलांच्या आजोबांचा मोबाइल नंबर लिहिला होता. चिठ्ठीवरील नंबरवरून पोलिसांना 18 मे रोजी आजोबांना बीडमध्ये बोलावून घेण्यात आले होते. 

आजोबाची स्कूटी आणि पैशांबाबत चौकशी 

मात्र, बीडमध्ये आल्यानंतर नातवांना जवळ करण्याऐवजी त्यांच्या आजोबाने महिलेची स्कूटी आणि पैशांबाबत प्रशासनाकडे चौकशी केली. आजोबांच्या अशा वागणुकीमुळे स्थानिक प्राशासातील पोलीस अधिकाऱ्यांनी देखील डोक्याला हात लावला. तसेच कोणत्याही पालकांनी आपल्या पोटच्या मुलांना असं रस्त्यावर टाकून नये, शासनाची सक्षम यंत्रणा आहे. 

हे ही वाचा : शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते विकास लवांडे यांना अटक, फेसबुकवरुन दिली माहिती, कारण काय?

दरम्यान, मुलांची माहिती मिळताच त्यांना ताब्यात घेत त्यांना पोलिसांनी आधार दिला होता. नंतर त्यांना बालकल्याण समितीसमोर हजर करत पुढील कायदेशीर कारवाई केली जात आहे. या प्रकरणाची एकूण माहिती ही शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रवीण कुमार बांगर यांनी दिली. 
 

हे वाचलं का?