डॉक्टरांनी लेकासाठी मोटेगावकरांकडून पेपर विकत घेतला, CBI ने आवळल्या मुसक्या
Neet Paper Leak : नीट पेपर लीक प्रकरणात स्वत:च्या मुलासाठी पेपर विकत घेतल्याच्या आरोपावरून बालरोग तज्ज्ञ यांना सीबीआयने काल रात्री ताब्यात घेतले. लातूरच्या औसा रोडजवळ सिद्धिविनायक रुग्णालयातील डॉक्टरांची मनोज शिरूरे अशी ओळख समोर आली.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
डॉक्टर शिरूरे यांच्यावर CBI ची धाड
लातूरमधून आतापर्यंत तिघांना अटक
Neet Paper Leak : नीट पेपर लीक प्रकरणात स्वत:च्या मुलासाठी पेपर विकत घेतल्याच्या आरोपावरून बालरोग तज्ज्ञ यांना सीबीआयने काल रात्री ताब्यात घेतले. लातूरच्या औसा रोडजवळील सिद्धिविनायक रुग्णालयातील डॉक्टरांची मनोज शिरूरे अशी ओळख समोर आली. बुधवारी रात्री सीबीआयने शिरूरे यांच्या सिद्धिविनायक रूग्णालयातच रात्री रेड टाकल्याची माहिती समोर आली.
हे ही वाचा : अंबाजोगाईचे दोघं लातूरमध्ये NEET ची तयारी करायचे, आता CBI कडून चौकशी, काय घडलं?
डॉक्टर शिरूरे यांच्यावर CBI ची धाड
याचदरम्यान डॉक्टर शिरूरे यांची कसून तीन तास चौकशी करण्यात आली होती. नंतर त्यांना नोटीस देऊन सोडवले. मात्र काल रात्री उशिराने त्यांना पुणे येथून सीबीआयने ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली. त्यांना पुढील चौकशीसाठी दिल्ली येथे रवाना करण्यात आले अशी सूत्रांनी माहिती दिली होती. त्यांनी आपल्या स्वत:च्या मुलासाठी मोटेगावकरांकडून नीटचा पेपर विकत घेतल्याचा आरोप केला आहे.
लातूरमधून आतापर्यंत तिघांना अटक
मात्र, पुढे तोच पेपर त्यांनी इतर कोणत्या विद्यार्थ्यांना दिला याचा देखील तपास सीबीआय करताना दिसते. नीट पेपर लीक प्रकरणात लातूर येथून ही तिसरी अटक करण्यात आली. याआधी पी व्ही कुलकर्णी आणि शिवराज मोटेगावकरनंतर डॉक्टर मनोज शिरूरे यांना CBI ने अटक केली.
हे ही वाचा : गुरु गोचर 2026 : 'या' राशीतील लोकांवर मोठं संकट निर्माण होणार
नीट पेपर लीक प्रकरण केवळ राज्यच नाही,तर आता देश हादरून गेला आहे. राज्यभरात मोटेगावकारांच्या शिक्षणामागाचा काळाबाजार समोर आला आहे. सीबीआयच्या या एकूण तपासातून याचे धागेदोरे कुठपर्यंत पोहोचले याचा तपास केला जाईल.









