पार्थ पवार आणि कायनात धार यांचा साखरपुडा, रोहित पवारांनी पत्रिका केली शेअर, कोण आहेत कायनात धार?

मुंबई तक

11 Jul 2026 (अपडेटेड: 11 Jul 2026, 07:38 PM)

Parth Pawar Engagement : राज्याचे दिवंगत नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांच्या विवाहाची सोशल मीडियावर चर्चा सुरु आहे. पार्थ पवार यांचा येत्या 29 जुलै 2026 रोजी साखरपूडा सोहळा पार पडणार आहे. आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडियावर पत्रिका शेअर करत पार्थ पवार यांना शुभेच्छा दिल्यात.

Parth Pawar Engagement

Parth Pawar Engagement

Google CTA

बातम्या हायलाइट

point

29 जुलै 2026 रोजी पार्थ पवार यांचा साखरपुडा

point

रोहित पवारांचं ट्विट

point

कोण आहेत कायनात धार? 

Parth Pawar Engagement : राज्याचे दिवंगत नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांच्या विवाहाची सोशल मीडियावर चर्चा सुरु आहे. पार्थ पवार यांचा येत्या 29 जुलै 2026 रोजी साखरपूडा सोहळा पार पडणार आहे. आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडियावर पत्रिका शेअर करत पार्थ पवार यांना सुखाच्या संसाराच्या शुभेच्छा देखील दिल्या आहेत.  

हे वाचलं का?

हे ही वाचा : व्हिएतनाममध्ये भारतीय पर्यटकांवर काळाचा घाला, 15 जणांचा दुर्दैवी मृत्यू

पार्थ पवार आणि कायनात धार यांचा साखरपुडा हा 29 जुलै 2026 रोजी पुण्यातील एका फार्म हाऊसवर होणार असल्याची चर्चा आहे. रेवती सुळे यांच्या विवाहात उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, जय पवार, पार्थ पवार, कायनात धार यांनी एकत्रितपणे आपली उपस्थिती दर्शवली होती. अशातच आता रोहित पवार यांनी पत्रिका शेअर करत साखरपुड्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

रोहित पवार यांचं जसंच्या तसं ट्विट 

प्रेमाच्या रेशीमगाठीत अडकून नवी इनिंग सुरु करणारे माझे प्रिय बंधू खा. पार्थ आणि कायनात या दोघांनाही साखरपुड्याच्या मनापासून शुभेच्छा! तुमचा पुढील प्रवास आनंदाचा, सुखाचा आणि समृद्धीचा होवो आणि तुमच्या दोघांचं प्रेमाचं हे नातं उत्तरोत्तर बहरत जावो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना!

हे ही वाचा : पालघरमध्ये पुराचे पाणी घरात शिरले, छतावर चार तास मृतदेहासोबत कुटुंब

कोण आहेत कायनात धार? 

कायनात धार या पार्थ पवार यांच्या होणाऱ्या पत्नी आहेत. त्या दिल्लीत राहत असून त्यांचे पवार कुटुंबीयांसोबत सलोख्याचे संबंध आहेत. रेवती सुळे यांच्या विवाहत त्या पार्थ पवारांसोबत दिसल्या होत्या. अजितदादांच्या निधनानंतर सांत्वनासाठी पोहोचल्या होत्या. मध्य प्रदेशातील महाकाल मंदिरात एकत्र दर्शनासाठी आणि पूजा करताना त्या दिसल्या होत्या. मंदिरातील त्यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. येत्या  29 जुलै रोजी त्यांचा साखरपुडा होणार आहे.