पार्थ पवारांची होणारी पत्नी कायनात दाराचं करिअर चर्चेत, कारकीर्द पाहून व्हाल थक्क!

मुंबई तक

13 Jul 2026 (अपडेटेड: 13 Jul 2026, 05:28 PM)

who is kaiynaat dara: पार्थ पवार यांच्यासोबत साखरपुडा होणार असलेल्या कायनात दारा यांची शैक्षणिक आणि व्यावसायिक वाटचाल चर्चेत आली आहे. दिल्लीत वास्तव्यास असलेल्या कायनात यांनी पत्रकारिता आणि मार्केटिंग क्षेत्रात विविध जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत.

who is kaiynaat dara

who is kaiynaat dara

Google CTA

बातम्या हायलाइट

point

पार्थ पवारांची होणारी पत्नी कायनात दाराचं करिअर चर्चेत

point

कारकीर्द पाहून व्हाल थक्क!

who is kaiynaat dara : राज्याचे दिवंगत नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांच्या विवाहाची चर्चा सध्या सोशल मीडियावर रंगली आहे. पार्थ पवार यांचा साखरपुडा 29 जुलै 2026 रोजी होणार असून, आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडियावर पत्रिका शेअर करत पार्थ आणि कायनात दारा या दोघांनाही शुभेच्छा दिल्या आहेत. "प्रेमाच्या रेशीमगाठीत अडकून नवी इनिंग सुरू करणारे माझे प्रिय बंधू पार्थ आणि कायनात या दोघांनाही साखरपुड्याच्या मनापासून शुभेच्छा," असे म्हणत त्यांनी त्यांच्या सुखी आणि समृद्ध वैवाहिक आयुष्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या. या पार्श्वभूमीवर पार्थ पवार यांची होणारी पत्नी कायनात दारा यांची शैक्षणिक आणि व्यावसायिक कारकीर्दही चर्चेचा विषय ठरली आहे.

हे वाचलं का?

हेही वाचा : जेजुरी अपघातातील मृत वारकऱ्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 5 लाखांची मदत; मुख्यमंत्र्यांची घोषणा

कोण आहेत कायनात दारा? ( who is kaiynaat dara)

कायनात दारा या मूळच्या काश्मीरच्या असून सध्या त्या दिल्लीत वास्तव्यास आहेत. गेल्या काही काळात त्या पार्थ पवार यांच्यासोबत अनेकदा सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये दिसून आल्या आहेत. काही महिन्यांपूर्वी मध्य प्रदेशातील महाकाल मंदिरात पार्थ पवार आणि कायनात दारा यांनी एकत्र दर्शन घेतल्याचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते. तसेच पवार कुटुंबाच्या कठीण काळातही त्या कुटुंबासोबत उभ्या राहिल्या. अजित पवार यांच्या निधनानंतर त्या बारामती येथे सांत्वनासाठी पोहोचल्या होत्या. मुंबईतील वरळी येथे आयोजित शोकसभा आणि दशक्रिया विधीलाही त्यांनी उपस्थिती लावली होती.

हेही वाचा : 'सेव्हन स्टारमध्ये नेते आणि चेलेच.., ही सेवा नाही तर मेवा' राजदीप सरदेसाईंनी केली पोलखोल!

कायनात दारा यांचं करिअर (who is kaiynaat dara)

लिंक्डइनवरील माहितीनुसार, कायनात दारा यांनी पत्रकारिता,  मार्केटिंग अशा विविध क्षेत्रांमध्ये काम केले आहे. त्या सध्या दिल्लीतील Koco Hospitality या संस्थेत मार्केटिंग डायरेक्टर म्हणून कार्यरत असून जुलै 2020 पासून ही जबाबदारी सांभाळत आहेत. यापूर्वी त्यांनी NDTV मध्ये पूर्णवेळ नोकरी करत टेलिव्हिजन न्यूज रिपोर्टर आणि आउटपुट एडिटर म्हणून काम केले. रिपोर्टर म्हणून त्यांनी नागरी प्रश्न, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच मनोरंजन आणि ट्रेंडिंग विषयांवर वार्तांकन केले, तर आउटपुट एडिटर म्हणून न्यूज बुलेटिनचे संपादन, व्हिडिओ स्क्रिप्ट लेखन आणि न्यूज रूममधील संपादकीय कामकाजाची जबाबदारी सांभाळली. त्याचबरोबर The London School of Economics and Political Science (LSE) येथे जवळपास तीन वर्षे स्टुडंट अकॅडमिक मेंटॉर म्हणून विद्यार्थ्यांना शैक्षणिक मार्गदर्शनकेले.

WONDER Foundation मध्ये कायनात यांनी पब्लिक पॉलिसी इंटर्न म्हणून काम केले. Bright Network मध्ये बिझनेस, ऑपरेशन्स अँड मार्केटिंग इंटर्न तसेच कमर्शियल लॉ इंटर्न म्हणून त्यांनी इंटर्नशिप पूर्ण केली आहे. 2018 मध्ये त्यांनी WWF-India मध्ये विद्यार्थी स्वयंसेवक म्हणून काम करत 'One Planet Academy' आणि 'Ek Prithvi' मोहिमांमध्ये सहभाग घेतला. या काळात त्यांनी वन्यजीव संरक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मुलाखती, शाळांपर्यंत जनजागृती पोहोचवण्याचे प्रयत्न आणि डिजिटल धोरणांवर त्यांनी  काम केले. पत्रकारिता, सामाजिक उपक्रम आणि व्यवस्थापन अशा विविध क्षेत्रांतील अनुभवामुळे कायनात दारा यांची व्यावसायिक वाटचाल लक्षवेधी ठरली असून, पार्थ पवार यांच्या साखरपुड्याच्या निमित्ताने त्यांची प्रोफाइलही चर्चेत आली आहे.