‘56 टक्के कमिशन’, वर्षभरापूर्वी बांधलेला नांदेडमधील उड्डाणपूल कोसळताच अंबादास दानवेंची पोस्ट

मुंबई तक

10 Jul 2026 (अपडेटेड: 10 Jul 2026, 12:48 PM)

nanded flyover collapse : नांदेडमधील उड्डाणपुलाचा भाग कोसळल्यानंतर ठाकरे गटाचे आमदार अंबादास दानवे यांनी "56 टक्के कमिशन" असा उल्लेख करत सोशल मीडियावर पोस्ट केली.

Nanded pool collapes

Nanded pool collapes

Google CTA

बातम्या हायलाइट

point

‘56 टक्के कमिशन’

point

वर्षभरापूर्वी बांधलेला नांदेडमधील उड्डाणपूल कोसळताच अंबादास दानवेंची पोस्ट

nanded flyover collapse : नांदेड शहरातील नांदेड-लातूर रोडवरील एसजीजीएस महाविद्यालयासमोरील उड्डाणपुलाचा एक भाग कोसळल्यानंतर या घटनेवरून राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. ठाकरे गटाचे विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी या घटनेच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यांनी "महाराष्ट्राचे लुटेरे.." असा मजकूर लिहित पूल कोसळल्याच्या ठिकाणाचा AI फोटो पोस्ट केला आहे. या फोटोमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोटो आणि "56% कमिशन" असा मजकूर असलेला फलक दाखवण्यात आला आहे. दानवेंच्या या पोस्टची सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली आहे.

हे वाचलं का?

हेही वाचा : Personal Finance: दरमहा 2 हजार गुंतवा आणि 42 हजार परत मिळवा, लखपती बनण्याचा फॉर्म्युला!

दुर्घटनेत दोन जण किरकोळ जखमी

नांदेड शहराजवळ एसजीजीएस कॉलेजसमोरील उड्डाणपुलाचा एक भाग आज सकाळी सुमारे 11 वाजण्याच्या सुमारास कोसळला. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. नांदेड-लातूर महामार्गावरील या उड्डाणपुलाचे काम वर्षभरापूर्वी पूर्ण झाले होते. एसजीजीएस महाविद्यालय आणि शासकीय रुग्णालय परिसर असल्याने या भागात मोठ्या प्रमाणावर वाहतूक सुरू असते. या दुर्घटनेत दोन जण किरकोळ जखमी झाले असून कोणतीही मोठी जीवितहानी झालेली नाही. या घटनेनंतर पूल आणि सर्व्हिस रोडवरील वाहतूक बंद करण्यात आली असून नांदेडहून लातूरकडे जाणाऱ्या वाहनांना पर्यायी मार्गाचा वापर करावा लागत आहे. कोसळलेल्या भागाच्या दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले आहे.

हेही वाचा : Personal Finance: दरमहा 2 हजार गुंतवा आणि 42 हजार परत मिळवा, लखपती बनण्याचा फॉर्म्युला!

"56 टक्के कमिशन"

दरम्यान, पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित अभियंत्याने नांदेडमध्ये रात्री झालेल्या भूकंपामुळे पुलाचा हा भाग कोसळल्याचा दावा केला आहे. मात्र, या घटनेनंतर पुलाच्या गुणवत्तेबाबत आणि बांधकाम प्रक्रियेबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत. या पार्श्वभूमीवर अंबादास दानवे यांनी केलेल्या पोस्टमुळे या प्रकरणाला राजकीय रंग चढला आहे. त्यांच्या पोस्टमध्ये "56 टक्के कमिशन" असा उल्लेख करत राज्यातील सार्वजनिक बांधकामांवर अप्रत्यक्षपणे टीका करण्यात आली आहे.

दरम्यान, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही अलीकडील पायाभूत सुविधांवरील घटनांवर भाष्य करत नव्याने उभारलेल्या प्रकल्पांच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यांनी नव्याने बांधलेल्या बोगद्याला गळती लागणे, पिलर पडणे यांसारख्या घटनांचा उल्लेख करत कंत्राटदारांना कंत्राटाच्या रकमेपैकी जवळपास 56 टक्के पैसे कमिशन म्हणून द्यावे लागतात, असा दावा केला. त्यामुळे उर्वरित रकमेत काम करावे लागत असल्याने रस्ते, पूल आणि इतर प्रकल्पांच्या गुणवत्तेवर परिणाम होत असल्याचे त्यांनी म्हटले. राज ठाकरेंच्या 56 टक्क्यांच्या वक्तव्यानंतर आता दानवेंनी थेट एआय जनरेटेड फोटो पोस्ट केलाय.