राज ठाकरेंना मुख्यमंत्र्यांचं जोरदार प्रत्युत्तर, म्हणाले...

मुंबई तक

10 Jul 2026 (अपडेटेड: 10 Jul 2026, 05:00 PM)

फडणवीसांनी राज ठाकरेंचे नाव न घेता जोरदार टोलेबाजी केली. यावेळी सभागृहात चांगलाच हशा पिकल्याचं पहायला मिळालं. फडणवीस म्हणाले की, 'आमचे मिमिक्री आर्टिस्ट मला म्हणाले हिंदीत का बोलले? पूर्ण भाषण मी मराठीतच केलं. पण मला काही अडचण नाही, ते आमचे मित्र आहेत.'

Devendra Fadnavis

Devendra Fadnavis

Google CTA

बातम्या हायलाइट

point

राज ठाकरेंना मुख्यमंत्र्यांचं जोरदार प्रत्युत्तर

point

म्हणाले...

Devendra Fadnavis On Raj Thackeray : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत वापरलेल्या 'भाडे के टट्टू' या शब्दावरुन आणि हिंदी वाक्यांवरुन चांगलीच चर्चा रंगली. त्यांच्या या विधानाचा काल (9 जुलै) मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी चांगलाच समाचार घेतला होता. त्यावरुन आज (10 जुलै) विधानसभेत फडणवीसांनी राज ठाकरेंचे नाव न घेता जोरदार टोलेबाजी केली. यावेळी सभागृहात चांगलाच हशा पिकल्याचं पहायला मिळालं. फडणवीस म्हणाले की, 'आमचे मिमिक्री आर्टिस्ट मला म्हणाले हिंदीत का बोलले? पूर्ण भाषण मी मराठीतच केलं. पण मला काही अडचण नाही, ते आमचे मित्र आहेत. आणि ते मित्र असल्यामुळं राजकारणात तर आम्हाला त्यांच्यापासून काही धोका नाही, पण आनंद आहे ते राजकारणात आहेत. ते जर मिमिक्रीच्या क्षेत्रात गेले असते, तर एकाही स्टँडअप कॉमेडियनला मार्केट राहिलं नसतं.' 

हे वाचलं का?

'हा महाराष्ट्राचाच अपमान'

विरोधकांच्या प्रस्तावाला उत्तर देताना फडणवीस बोलत होते. ते म्हणाले की, 'परवा मी विधानसभेत भाषण केल्यावर अनेक लोकांना मिरची लागली. पण मी अतिशय स्पष्टपणे सांगितलं, मिसिंग लिंकवर जो पूल आहे, केबल स्टेड ब्रिज आहे, त्याठिकाणी जगातले सगळ्यात मोठे टनेल आहेत. याला एकही क्रॅक गेलेली नसताना त्याचं काहीही निकसान झालेलं नसताना 7000 कोटी पाण्यात गेले हा माझा अपमान आहे? महाराष्ट्राचाच अपमान आहे. खोट्या बातम्या पेरणं, अफवा पसरवणं हा महाराष्ट्राचा अपमान आहे. 

हे ही वाचा : मिसिंग लिंक : पहाटे तीनची वेळ, समोर कोसळती दरड अन् SOSचं बटण, तरुणांच्या प्रसंगावधानाची चर्चा

'मी तर सुपारीबाजांबद्दल बोललो होतो'

यापुढं बोलताना ते म्हणाले की, 'मी बोलता-बोलता त्याठिकाणी हिंदीमध्ये बोललो-भाडे के टट्टू-काही लोकांना त्याचंही दु:ख झालं. आणि ते म्हणाले मुख्यमंत्र्यांनी सुसंस्कृत बोलायला पाहिजे होतं. म्हणून मी अभ्यास केला. भाडे के टट्टू हे माझं वाक्य परत घेतो आणि त्याला सुसंस्कृतपणे भाटकगदर्भ म्हणतो. आणि मग जर कोणाला समजलं नसेल तर सुपारीबाज. पण मी तर काही सुपारीबाजांबद्दल बोललो होतो. मी टोपी फेकली होती. अनेकांना का लागली मला समजलंच नाही.'

हे ही वाचा : ‘56 टक्के कमिशन’, वर्षभरापूर्वी बांधलेला नांदेडमधील उड्डाणपूल कोसळताच अंबादास दानवेंची पोस्ट

ते जर मिमिक्रीच्या क्षेत्रात गेले तर...

राज ठाकरेंना अप्रत्यक्षपणे टोला लगावताना फडणवीस म्हणाले की, 'बरं ते जाऊ द्या. मी एक वाक्य हिंदीत बोललो. ते ज्यांना समजायला पाहिजे होतं म्हणून बोललो त्यांच्या ऐवजी दुसऱ्यांनाच मिरची लागली. आणि आमचे मिमिक्री आर्टिस्ट मला म्हणाले हिंदीत का बोलले? पूर्ण भाषण मी मराठीतच केलं. पण मला काही अडचण नाही, ते आमचे मित्र आहेत. आणि ते मित्र असल्यामुळं राजकारणात तर आम्हाला त्यांच्यापासून काही धोका नाही, पण आनंद आहे ते राजकारणात आहेत. ते जर मिमिक्रीच्या क्षेत्रात गेले असते, तर एकाही स्टँडअप कॉमेडियनला मार्केट राहिलं नसतं.'