"रमेश म्हात्रेंना अटक करा अन्यथा..", रोहित पवारांचा सरकारला थेट इशारा

मिथिलेश गुप्ता

• 05:01 PM • 08 Jul 2026

Rohit Pawar On Shastri Nagar Hospital Case : केडीएमसी महापालिका परिसरातील शास्त्रीनगर रुग्णालयात रमेश म्हात्रे नावाच्या शिंदे यांच्या नगरसेवकाने महिला डॉक्टर आणि पारिचचारिकांवर हल्ला केला होता. हे प्रकरण आता चांगलंच तापलेलं दिसून येत आहे. या प्रकरणाबाबत त्यांनी सरकारला थेट सवाल करत इशारा दिला आहे.

Mumbai Tak
Google CTA

बातम्या हायलाइट

point

शास्त्रीनगर रुग्णालयातील मारहाण प्रकरणी रोहित पवार आक्रमक 

point

सरकरला दिला इशारा

Rohit Pawar On Shastri Nagar Hospital Case : केडीएमसी महापालिका परिसरातील शास्त्रीनगर रुग्णालयात रमेश म्हात्रे नावाच्या शिंदे यांच्या नगरसेवकाने महिला डॉक्टर आणि पारिचचारिकांवर हल्ला केला होता. हे प्रकरण आता चांगलंच तापलेलं दिसून येत आहे. या प्रकरणात विरोधकांनी शिंदेसेनेला चांगलंच झोडपून काढलं आहे. आदित्य ठाकरे यांच्यानंतर रोहित पवार यांनी रुग्णालयात गेले आणि त्यांनी कर्मचाऱ्यांना भेट दिली. तसेच आरोपीला अटक करण्याची मागणी देखील केली. अटक न केल्यास तीव्र आंदोलन छेडलं जाईल असा इशाराही दिला. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : ‘एक डॉक्टर म्हणून मी…’, महिला डॉक्टरला मारणाऱ्या शिंदेंच्या नगरसेवकावर श्रीकांत शिंदेंची वक्रदृष्टी

नेमकं काय म्हणाले रोहित पवार? 

प्रसारमाध्यांशी बोलताना रोहित पवार यांनी केडीएमसी परिसरातील शास्त्रीनगर रुग्णालयात मारहाण प्रकरणी सरकारला धारेवर धरलं आहे. "डॉक्टरांवर हात उचलणाऱ्यांना कोणतेही राजकीय संरक्षण मिळता कामा नये. रमेश म्हात्रे यांना तातडीने अटक व्हावी. कारवाई न झाल्यास आम्ही तीव्र आंदोलन करू," असा थेट इशारा दिला. 

रोहित पवारांचे सत्ताधाऱ्यांना तिखट सवाल

"गंभीर घटनेनंतर आरोग्यमंत्री, राज्यमंत्री किंवा इतर वरिष्ठ नेते रुग्णालयात का आले नाहीत?," असा प्रश्न देखील केला. "कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे किंवा स्थानिक आमदार का आले नाहीत? भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी देखील डॉक्टरांना भेटून धीर का दिला नाही? ",असे प्रश्न केले. 

हे ही वाचा : पुण्यात ऊर्जा निर्मिती प्रकल्पाची इमारत कोसळली, 14 जण अडकून बसले

शास्त्रीनगर रुग्णालयातील डॉक्टर आणि परिचारिकांवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ कल्याण-डोंबिवली परिसरातील डॉक्टरांनी नियमित ओपीडी सेवा बंद ठेवत आंदोलन सुरू केले. सध्या आपत्कालीन सेवा सुरू असून आरोपींना तातडीने अटक करावी. डॉक्टरांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे, त्यावर उपाययोजना करावी, अशी मागमी वैद्यकीय संघटनांकडून जोर धरू लागली आहे.