"अशाने मोठ्या नेत्यांची विश्वासार्हता कमी होते...", संजय राऊत पवारांवर भडकले

मुंबई तक

• 03:18 PM • 09 Jul 2026

sanjay raut on sharad pawar : 'गद्दाराच्या छताखाली' जाऊन बैठक घेणे मोठ्या नेत्याच्या विश्वासार्हतेला धक्का देणारे असल्याचे मत खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केले. शरद पवार उपमुख्यमंत्री शिंदेंच्या दालनात गेल्याने राऊतांनी नाराजी व्यक्त केली. याचबरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही त्यांनी जोरदार निशाणा साधला.

sanjay raut slams sharad pawar

sanjay raut slams sharad pawar

Google CTA

बातम्या हायलाइट

point

"अशाने मोठ्या नेत्यांची विश्वासार्हता कमी होते..."

point

संजय राऊत पवारांवर भडकले

sanjay raut on sharad pawar, मुंबई : "ज्या गद्दाराने आपले सरकार पाडले, त्या गद्दाराच्या छताखाली जाऊन बैठक घेणे मोठ्या नेत्याच्या विश्वासार्हतेला धक्का देणारे आहे", असं म्हणत खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याबाबतची नाराजी बोलून दाखवली. सीमाप्रश्नाच्या बैठकीसाठी विधीमंडळात आलेल्या शरद पवारांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली. यावेळी शिंदेंनी पवारांचं स्वागत देखील केलं. विशेष म्हणजे कॅबिनेट बैठक सोडून शिंदे पवारांचं स्वागत करण्यासाठी आले. दुसरीकडे शिंदेंच्या दालनातच पवारांनी आमदार, खासदारांची बैठक घेतली. पवारांच्या या कृतीवर संजय राऊत आक्रमक झाले असून त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. 

हे वाचलं का?

हेही वाचा : मुंबईतील प्रसिद्ध रुस्तम आईस्क्रिमचा परवाना रद्द, तुकाराम मुंढेंच्या निर्देशानंतर मोठी कारवाई

"आम्ही असतो तर अजित पवारांच्या दालनात..", संजय राऊत काय म्हणाले? 

संजय राऊत म्हणाले की, समोर राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यालय आणि यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान असताना गद्दारांच्या दालनात बैठक घेण्याची गरज नव्हती. आम्ही असतो तर अजित पवारांच्या दालनात आमच्या पक्षाची बैठक घेतली नसती. ज्यांनी आपल्या पक्षाशी बेईमानी केली, त्यांच्या छताखाली जाऊन पक्षाच्या बैठका घेण्याइतके आमचे मन मोठे नाही, असेही  ते म्हणाले. 

हेही वाचा : 38 वर्षीय प्रेयसीच्या नादाला लागला, लग्नानंतर तिसऱ्याच महिन्यात बायकोसोबत केलं नको तेच

"गद्दारीविरोधात बोलण्याचा नैतिक अधिकार राहात नाही"

शरद पवार हे राष्ट्रीय लोकशाही आघाडीत (एनडीए) जाणार नाहीत, असा विश्वासही संजय राऊतांनी व्यक्त केला. मात्र, कालची कृती शिवसेनेला अस्वस्थ करणारी असल्याचे सांगत, गद्दारांना प्रतिष्ठा दिल्यास गद्दारीविरोधात बोलण्याचा नैतिक अधिकार राहात नाही, असे त्यांनी नमूद केले. हा विषय पक्षासाठी गंभीर असून, संधी मिळाल्यास याबाबत शरद पवारांशी चर्चा करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

याच पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही संजय राऊत यांनी जोरदार हल्लाबोल केला. संजय राऊत म्हणाले, महाराष्ट्राला संस्कारी मुख्यमंत्री हवा असून, गेल्या चार वर्षांत राज्याने सध्याचे आणि आधीचे मुख्यमंत्री यांचे संस्कार अनुभवले आहेत. जनतेला "कुत्रे" आणि "भाड्याचे तट्टू" अशी उपमा देणे हा महाराष्ट्राच्या स्वाभिमानी जनतेचा अपमान असल्याचे  त्यांनी म्हटले. जनतेच्या कराच्या पैशातून प्रकल्प उभारले जातात, त्यांची किंमत वाढवून भ्रष्टाचार केला जातो आणि प्रकल्पांमध्ये त्रुटी आढळल्यानंतर प्रश्न विचारणाऱ्यांनाच लक्ष्य केले जाते, अशी टीकाही त्यांनी केली. महाराष्ट्रात सुलतानशाही आणि आणीबाणीचे वातावरण निर्माण झाल्याचा आरोप करत, सरकारविरोधात बोलणाऱ्यांना धमक्या दिल्या जात असल्याचेही त्यांनी म्हटले.