‘एक डॉक्टर म्हणून मी…’, महिला डॉक्टरला मारणाऱ्या शिंदेंच्या नगरसेवकावर श्रीकांत शिंदेंची वक्रदृष्टी

मुंबई तक

• 12:40 PM • 08 Jul 2026

Shrikant Shinde : "रुग्णसेवा ही केवळ एक नोकरी नसून ती मानवतेची सेवा आहे. तणापूर्ण परिस्थितीत डॉक्टर, पारिचारिका आणि इतर आरोग्य कर्माचारी दिवस-रात्र जनतेच्या सेवेसाठी कार्यरत झालेली आहेत, या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली", कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात शिंदे सेनेच्या नगरसेवकाने महिला डॉक्टरला मारहाण केली होती. त्यानंतर श्रीकांत शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.

Shrikant Shinde

Shrikant Shinde

Google CTA

बातम्या हायलाइट

point

शिंदेंच्या नगरसेवकाकडून मारहाण

point

श्रीकांत शिंदे यांचं ट्विट

point

"दोषींवर शिस्तभंगाची कारवाई"

Shrikant Shinde : "रुग्णसेवा ही केवळ एक नोकरी नसून ती मानवतेची सेवा आहे. तणापूर्ण परिस्थितीत डॉक्टर, पारिचारिका आणि इतर आरोग्य कर्माचारी दिवस-रात्र जनतेच्या सेवेसाठी कार्यरत झालेली आहेत, या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली", कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात शिंदे सेनेच्या नगरसेवकाने महिला डॉक्टरला मारहाण केली होती. त्यानंतर श्रीकांत शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.

हे वाचलं का?

हे ही वाचा : Monsoon Update : 20 वर्षांचा विक्रम मोडला, अतिमुसळधार पाऊस, डेटाच सांगतोय!

श्रीकांत शिंदे यांचं ट्विट

कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या (केडीएमसी) शास्त्री नगर रुग्णालयातील डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांवर झालेला हल्ला अत्यंत निंदनीय आहे. डॉक्टर म्हणून मला माहित आहे की रुग्णसेवा ही केवळ एक नोकरी नसून मानवतेची सेवा आहे. 

"कोणत्याही व्यक्तीला पक्षाकडून पाठिंबा नाही"

डॉक्टर, परिचारिका आणि इतर आरोग्य कर्मचारी जनतेच्या सेवेसाठी रात्रंदिवस परिश्रम घेतात. या घटनेप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कायदा हातात घेईल त्याला सोडले जाणार नाही आणि दोषींवर कायद्यानुसार कठोर कारवाई केली जाईल. या प्रकरणी पक्षाची भूमिकाही स्पष्ट आहे. या हल्ल्यात सहभागी असलेल्या कोणत्याही व्यक्तीला पक्ष पाठिंबा देणार नाही. 

हे ही वाचा : Maharashtra Weather : राज्यावर अस्मानी संकट, जिल्ह्यांना अतिवृष्टीचा इशारा

"दोषींवर शिस्तभंगाची कारवाई"

"दोषींवर शिस्तभंगाची कारवाई केली जाईल, लोकप्रतिनिधी आणि डॉक्टर म्हणून, मी केडीएमसी रुग्णालयातील सर्व डॉक्टर, परिचारिका आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांसोबत खंबीरपणे उभा आहे. आपण सर्वांनी त्यांच्या सुरक्षिततेबाबत निर्भयपणे सेवा देण्याच्या अधिकाराचा स्वीकार करावा," असं ट्विट त्यांनी केलं.