शरद पवार अनेक वर्षांनी विधान भवनात, येताच शिंदेंच्या केबिनला, मग भेटी, काय केलं?

मुंबई तक

09 Jul 2026 (अपडेटेड: 09 Jul 2026, 09:51 AM)

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार अनेक वर्षांनंतर विधानभवनात दाखल झाले. विधानभवनात पोहोचल्यानंतर त्यांनी सर्वप्रथम उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दालनाला भेट दिली. त्यानंतर झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शेजारी बसल्याचे दृश्यही चर्चेचा विषय ठरले.

Sharad Pawar In Vidhanbhavan

Sharad Pawar In Vidhanbhavan

Google CTA

बातम्या हायलाइट

point

शरद पवार अनेक वर्षांनी विधान भवनात

point

येताच शिंदेंच्या केबिनला

point

मग भेटी, काय केलं?

Sharad Pawar In Vidhanbhavan : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार अनेक वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर मुंबईतील विधान भवनात दाखल झाले. यामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. शरद पवार तब्बल 34 वर्षांनंतर विधानभवनात आले होते. विधानभवनात आयोजित करण्यात आलेल्या 'महाराष्ट्र एकीकरण समिती'च्या अत्यंत महत्त्वाच्या बैठकीत सहभागी होण्यासाठी ते खास उपस्थित राहिले होते. मात्र, या बैठकीव्यतिरिक्त त्यांनी घेतलेल्या इतर भेटींनीच सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

हे वाचलं का?

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट

महाराष्ट्र एकीकरण समितीची ही बैठक संपल्यानंतर शरद पवार यांनी थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दालनाकडे आपला मोर्चा वळवला. या वेळी त्यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि आमदार जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड तसेच शशिकांत शिंदे हे प्रमुख नेतेही उपस्थित होते. या अनपेक्षित भेटीमुळे विधानभवन परिसरात काही काळ राजकीय हालचालींना वेग आला होता.

हे ही वाचा : अंकशास्त्र आणि राजकारण्यांचं भवितव्य, पाहा ठाकरे, शिंदे आणि फडणवीसांचं पुढे काय होणार?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या शेजारी

शरद पवार यांच्या या अचानक झालेल्या विधानभवन भेटीमुळे आणि सत्ताधाऱ्यांशी साधलेल्या संवादामुळे राज्याच्या राजकारणात विविध तर्क-वितर्कांना उधाण आले आहे. विधानभवनात पोहोचल्यानंतर त्यांनी सर्वप्रथम उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दालनाला भेट देऊन त्यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर आयोजित बैठकीत शरद पवार हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शेजारी बसल्याचे पाहायला मिळाले. हे दुर्मिळ दृश्य समोर येताच राजकीय वर्तुळातील चर्चा अधिकच रंगू लागल्या आहेत.

हे ही वाचा : विरारच्या पुरातून वाचत ऑफिस कर्मचारी अंधेरीत आला अन् घात झाला!

नवी राजकीय समीकरणे?

सदर बैठकीत सीमाभागातील मराठी भाषिकांच्या प्रश्नांवर सविस्तर चर्चा झाल्याचे बोलले जात असले, तरी शरद पवार यांनी सत्ताधाऱ्यांच्या दालनात जाऊन घेतलेली भेट आणि मुख्यमंत्र्यांच्या सोबतीने बसणे या गोष्टी आगामी काळातील नव्या समीकरणांची नांदी तर नाही ना, अशी चर्चा आता रंगू लागली आहे.  या भेटीचे पडसाद आगामी काळात उमटण्याची शक्यता वर्तवली जात आहे.