थकलेला चेहरा अन् अशक्तपणा, एकनाथ शिंदेंच्या प्रकृतीची अपडेट, Photo व्हायरल

मुंबई तक

05 Jul 2026 (अपडेटेड: 05 Jul 2026, 08:52 PM)

Eknath Shinde Health Update : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शनिवारी ठाण्यातील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती समोर आली आहे. माध्यमांशी बोलताना मंत्री संजय शिरसाट यांनी एकनाथ शिंदे यांच्या प्रकृतीबाबत अपडेट दिली होती. मात्र, अशातच एकनाथ शिंदे यांच्या प्रकृतीची आणि डिस्चार्जबाबतची अपडेट समोर आली आहे.

Eknath Shinde Health Update

Eknath Shinde Health Update

Google CTA

बातम्या हायलाइट

point

एकनाथ शिंदे यांच्या प्रकृतीची अपडेट 

point

रुग्णालयातील फोटो व्हायरल

Eknath Shinde Health Update : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शनिवारी ठाण्यातील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती समोर आली आहे. माध्यमांशी बोलताना मंत्री संजय शिरसाट यांनी एकनाथ शिंदे यांच्या प्रकृतीबाबत अपडेट दिली होती. मात्र, अशातच एकनाथ शिंदे यांच्या प्रकृतीची आणि डिस्चार्जबाबतची अपडेट समोर आली आहे.

हे वाचलं का?

हे ही वाचा : साताऱ्यातील ताथवडे घाटात चारचाकीवर दरड कोसळली, भीषण अपघातात चालक ठार

एकनाथ शिंदे यांच्या प्रकृतीची अपडेट 

एकनाथ शिंदे यांची प्रकृती स्थिर असली तरीही, त्यांना व्हायरल इन्फेक्शन, ताप आणि अशक्तपणा जाणवत असल्याची माहिती आहे. अंदाजे मंगळवारपर्यंत त्यांच्यावर उपचार करण्यात येण्याची अधिक शक्यता आहे. त्यांच्या डिस्चार्जबाबत अद्यापही अधिकृतपणे माहिती समोर आलेली नाही.

ऑपरेशन टायगर आणि नंतर सचिन अहिरे यांच्या पक्षप्रवेशानंतर एकनाथ शिंदे यांची प्रचंड धावपळी होती. पावसाळी अधिवेशन सुरु झाल्याने एकनाथ शिंदे यांना विश्रांती मिळाली नसल्याने त्यांची तब्येत बिघडली. शुक्रवारी रात्री त्यांना अशक्तपणा जाणवला. त्यांना ताप आल्याने ठाण्याच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. 

हे ही वाचा : पैसा-पाणी: पेट्रोलमध्ये Ethanol मिसळण्याचं काय आहे सत्य?

थकलेला चेहरा अन् अशक्तपणा 

रुग्णालयातील त्यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. एकनाथ शिंदे यांचा थकलेला चेहरा दिसून येतो. त्यांच्या डिस्चार्जबाबतची अपडेट अद्याप समोर आलेली नाही. पण मंगळवारपर्यंत डिस्चार्ज दिला जाईल अशी शक्यता आहे, मात्र अधिकृत माहिती नाही.