"मुख्यमंत्री आहेस ना तू..", फडणवीसांच्या विधानसभेतील भाषणावरुन राज ठाकरे संतापले

मुंबई तक

• 01:33 PM • 09 Jul 2026

Raj Thackeray on Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मिसिंग लिंकबाबत विधानसभेत केलेल्या भाषणावरुन राज ठाकरेंनी संताप व्यक्त केला..

Raj Thackeray on Devendra Fadnavis

Raj Thackeray on Devendra Fadnavis

Google CTA

बातम्या हायलाइट

point

"मुख्यमंत्री आहेस ना तू.."

point

फडणवीसांच्या विधानसभेतील भाषणावरुन राज ठाकरे संतापले

Raj Thackeray on Devendra Fadnavis, Mumbai : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत मिसिंग लिंकच्या गळतीवरुन  स्पष्टीकरण तर दिलेच मात्र, यावेळी त्यांनी विरोधकांना इशाराही दिला. शिवाय, सोशल मीडियावर जाब विचारणाऱ्या लोकांना देवेंद्र फडणवीस यांनी भर सभागृहात कुत्ता, भाडे के टट्टू वगैरे शब्द वापरले होते. मुख्यमंत्र्यांच्या या भाषणाचा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी  रेल्वे कामगार सेनेचा वर्धापन दिनाच्या निमित्ताने केलेल्या भाषणात चांगलाच समाचार घेतला. ते काय म्हणाले? जाणून घेऊयात..

हे वाचलं का?

हेही वाचा : 38 वर्षीय प्रेयसीच्या नादाला लागला, लग्नानंतर तिसऱ्याच महिन्यात बायकोसोबत केलं नको तेच

महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हिंदीत बोलतो कशासाठी?

राज ठाकरे म्हणाले, "मला दुसरं एक कळालं नाही..मुख्यमंत्र्यांचं विधानसभेतील भाषण... मिसिंग लिंक हे उत्तम दर्जाचं कंस्ट्रक्शन आहे वगैरे वगैरे... आणि याचं जर समजा कोणी राजकारण करत असेल आम्ही बघून घेऊ त्यांना... मुख्यमंत्री आहेस ना तू?? बघून घेऊ...? बरं झालं ते झालं... पुढे वाक्य संपल्या संपल्या हिंदीतून बोलायला सुरु केलं. कोणासाठी हिंदी बोललात? समोर आमदार मराठी होते. महाराष्ट्राची विधानसभा आहे... महाराष्ट्राच्या विधानसभेत आमचा मुख्यमंत्री हिंदीत बोलतो कशासाठी? कोणाला सांगायचं होतं? कदाचित आपल्याच पक्षातील वरच्या लोकांना सांगायचं असेल बघून घेईल...त्यांनाही माहिती आहे..व्हिडीओ वगैरे कुठून येत आहेत. हे सगळं राजकारण काय सुरु आहे? हे मी माझ्या पत्रकार परिषदेतही बोललो होतो. जे काय त्यांच्या पक्षामध्ये घमासान सुरु आहे ना? ते पाहात राहा... "

हेही वाचा : अंकशास्त्र आणि राजकारण्यांचं भवितव्य, पाहा ठाकरे, शिंदे आणि फडणवीसांचं पुढे काय होणार?

रस्ते, पूल आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नव्हे

पुढे बोलताना राज ठाकरे म्हणाले, "मुंबई-ठाणे- पुणे सर्व शहरांचा विचका झालेला आहे. ज्याला हे विकास म्हणत आहेत. मी या विषयावर गेल्या अनेक वर्षांपासून बोलतोय. आपल्याकडे डेव्हलपमेंट प्लॅन येतो. पण टाऊन प्लानिंग येत नाही. माझी मुख्यमंत्र्यांना विनंती आहे, सगळी कंस्ट्रक्शन एकदा बंद करुन टाका. फक्त रस्ते, पूल आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नव्हे... हे लोकं परदेशात जातात तेव्हा काय करतात? परदेशातील शहरे पाहा.. मिसिंग लिंकचं 1 मेला उद्घाटन झालं. आणि 6-7 मे ला त्यातून पाणी वाहतंय.. 60-65 दिवसात तुमचा टनेल गळायला लागतो... मुख्यमंत्री मिसिंग लिंक म्हणाले होते...कॅनडामधून आम्ही त्याचा रिसर्च केलाय. यांनी त्याचं डिझाईन केलंय..इंडोनेशियामधून पाईप आणलेत.. जर्मनीतून काहीतरी केलंय... मग भारतीय कंत्राटदाराने तो टनेल बनवलाय. त्यांनाच द्यायचा होता ना बनवायला.. एखाद्याला कंत्राट मिळाल्यानंतर 56 टक्के पैसे वाटायला लागतात म्हणे... चारायला लागतात. म्हणजे जे काय काम आहे..ते त्यांनी 44 टक्क्यांमध्ये करायचं? तुम्हाला असेल रस्ते आणि खड्डे मिळणार... आपल्या कंत्राटदारांचं कामच नाही ते.. आपलं अगोदरच विटी स्टेशन 1800 सालात बांधलंय.. आजही ते लोकांना पुरतय... एवढी लोकसंख्या वाढल्यानंतर देखील तिथं एवढी माणसं येतात. रेल्वेने जातात येतात..."