ठाकरे गटाचे माजी खासदार विनायक राऊत अडचणीत, सुनेचे गंभीर आरोप, गुन्हा दाखल

मुस्तफा शेख

12 Jul 2026 (अपडेटेड: 12 Jul 2026, 11:24 AM)

ठाकरे गटाचे माजी खासदार विनायक राऊत यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. त्यांच्या सुनेने राऊत कुटुंबियांवर गंभीर आरोप केले आहेत. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Vinayak Raut

Vinayak Raut

Google CTA

बातम्या हायलाइट

point

ठाकरे गटाचे माजी खासदार विनायक राऊत अडचणीत

point

सुनेचे गंभीर आरोप

point

गुन्हा दाखल

Vinayak Raut Case : ठाणे येथील कापूरबावडी पोलीस ठाण्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे माजी खासदार विनायक राऊत आणि त्यांचे नगरसेवक पुत्र गीतेश राऊत यांच्यासह कुटुंबातील इतर सदस्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही तक्रार गीतेश राऊत यांची पत्नी गिरिजा राऊत यांनी दिली असून, या धक्कादायक प्रकरणामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. गिरिजा यांनी आपल्या सासरच्या मंडळींवर अतिशय गंभीर आणि खळबळजनक आरोप केले आहेत.

हे वाचलं का?

विवाहानंतर शारीरिक, मानसिक छळ

पीडित गिरिजा राऊत यांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार, विवाहानंतर राऊत कुटुंबाकडून त्यांचा मोठ्या प्रमाणावर मानसिक आणि शारीरिक छळ केला जात होता. इतकेच नव्हे तर, अघोरी कृत्ये आणि जादूटोणा करण्यासाठी त्यांच्या डोक्याचे केस कापून काढण्यात आले होते. याशिवाय, त्यांच्या इच्छेविरुद्ध त्यांना बळजबरीने गोमूत्र पिण्यास भाग पाडले जात असल्याचा अत्यंत धक्कादायक आरोपही त्यांनी आपल्या तक्रारीत केला आहे.

हे ही वाचा : 'पूजा करा, तुमच्या मुलाला नोकरी लागेल...' नागपुरातील भोंदू बाबाचा महिलेवर बलात्कार

छळ, जादूटोणा आणि मानसिक त्रास

याप्रकरणी पोलिसांनी दाखल केलेल्या प्रथम माहिती अहवालानुसार (एफआयआर), या छळवणुकीत आणि जादूटोण्याच्या अघोरी कृत्यांमध्ये फिरोज बाबा आणि काझी बाबा नावाच्या दोन व्यक्तींचाही थेट सहभाग होता. सासरच्या लोकांच्या सांगण्यावरूनच या दोन्ही बाबांनी पीडितेवर तांत्रिक विधी केले होते, असा आरोप आहे. या कृत्यांमुळे पीडित महिलेला प्रचंड मानसिक त्रासाला सामोरे जावे लागले.

हे ही वाचा : बीड : कामावरुन घरी परतणाऱ्या आचाऱ्याची निर्घृण हत्या, नेमकं कारण काय?

फिरोज बाबाला अटक

कापूरबावडी पोलिसांनी या तक्रारीची दखल घेत माजी खासदार विनायक राऊत, त्यांचे पुत्र नगरसेवक गीतेश राऊत आणि दोन्ही संशयित बाबांसह संबंधित सदस्यांवर विविध कलमांखाली गुन्हा नोंदवला आहे. याप्रकरणी फिरोज शेख उर्फ फिरोज बाबा याला अटक करण्यात आली आहे, कौटुंबिक छळ, जादूटोणा विरोधी कायद्याचे उल्लंघन आणि छळवणुकीच्या या गंभीर प्रकरणाचा पुढील तपास ठाणे पोलीस करत असून, या प्रकरणात लवकरच संबंधितांची चौकशी केली जाण्याची शक्यता आहे.