शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते विकास लवांडे यांना अटक, फेसबुकवरुन दिली माहिती, कारण काय?

NCP leader Vikas Lawande arrested by wagholi police : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते विकास लवांडे यांना वाघोली पोलिसांनी अटक केली असून, त्यांनी फेसबुक पोस्टद्वारे पोलिसांच्या या कारवाईवर तीव्र संताप व्यक्त केला आहे.

NCP leader Vikas Lawande

NCP leader Vikas Lawande

मुंबई तक

21 May 2026 (अपडेटेड: 21 May 2026, 02:55 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते विकास लवांडे अटक

point

फेसबुक पोस्टमध्ये सांगितलं कारण

NCP leader Vikas Lawande arrested by wagholi police : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते विकास लवांडे यांना पुण्यातील वाघोली पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. या अटकेच्या संपूर्ण नाट्यमय घडामोडींबाबत त्यांनी स्वतः आपल्या अधिकृत फेसबुक पोस्टद्वारे सविस्तर माहिती देत पोलिसांच्या या कारवाईवर तीव्र संताप व्यक्त केला आहे. विकास लवांडे यांनी आपल्या पोस्टमध्ये पुणे पोलिसांच्या कार्यपद्धतीवर थेट टीका करत, पोलिसांची ही कारवाई म्हणजे 'चोर सोडून संन्याशाला फाशी' देण्यासारखी असल्याचा गंभीर आरोप केला आहे. या अटकेमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

हे वाचलं का?

हेही वाचा : बायको-लेकरु.., 25 लाख रुपये अन् तिच्या सौंदर्याची मोहिनी, भयंकर प्रकरण! काय घडलं?

विकास लवांडे यांनी फेसबुक पोस्टमध्ये पोलिसांवर गंभीर आरोप करताना म्हटले आहे की, पुणे पोलिसांची चोर सोडून संन्याशाला फाशी..माझ्यावर जीवघेणा हल्ला करणारे आरोपी मोकाट असून वाघोली पोलीस स्टेशन एका खोट्या फिर्यादीवरून कसलाही पुरावा नसताना मला अटक करण्यासाठी मला फोन न करता रात्री घरी आले मी घरी नव्हतो कुटुंबीयांना माझ्या अटकेबाबत निरोप दिला कुटुंबांना घाबरवण्याचा हा प्रयत्न होता काय ? असा माझा सवाल आहे ? पोलीस मला फोन करू शकले असते. मी फरार नाही किंवा माफीवीर नाही. शासनाने मला जरूर अटक करावी मी पोलिसांना सहकार्य करणारा माणूस आहे कारण मी कायदा पाळणारा माणूस आहे कायदा हातात घेणारा माणूस नाही. सत्यासाठी लढत राहणार सत्याग्रही पद्धतीने जामीन , वकील ,दंड देणार नाही. पुणे पोलिसांनी मला जरूर अटक करावी मी तयार आहे. आता मला पुण्यातून पोलीस वाघोली पोलीस स्टेशनला घेऊन चाललेले आहेत.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

अंबाजोगाईचे दोघं लातूरमध्ये NEET ची तयारी करायचे, आता CBI कडून चौकशी, काय घडलं?