कोणत्याही न्यायात सहानुभूतीचं कार्ड चालत नाही, पार्थ पवार जमीन घोटाळ्यातून सुटणं शक्यच नाही, अंजली दमानिया आक्रमक

Anjali Damania on Parth Pawar : पार्थ पवार हे मुंढवा जमीन घोटाळ्यात निर्दोष असल्याचं खारगे समितीनं म्हटलं होतं. मात्र या सर्व शक्यता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी फेटाळून लावल्या आहेत. आज (5 फेब्रुवारी) मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. खारगे समितीतर्फे पार्थ पवार यांना कोणतीही क्लिन चीट मिळाली नसल्याचं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. त्या म्हणाल्या की, 'मुंढवा जमीन घोटाळ्या प्रकरणी पार्थ पवार यांना खारगे समितीनं कोणतीच क्लिन चीट दिलेली नाही. अजून समितीची शेवटची बैठक बाकी आहे. याविषयी माध्यमांमध्ये आलेल्या बातम्या धादांत खोट्या आहेत.'

Anjali Damania on Parth Pawar

Anjali Damania on Parth Pawar

मुंबई तक

05 Feb 2026 (अपडेटेड: 05 Feb 2026, 12:58 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

कोणत्याही न्यायात सहानुभूतीचं कार्ड चालत नाही

point

पार्थ पवार जमीन घोटाळ्यातून सुटणं शक्यच नाही

point

अंजली दमानिया आक्रमक

Anjali Damania on Parth Pawar : पार्थ पवार हे मुंढवा जमीन घोटाळ्यात निर्दोष असल्याचं खारगे समितीनं म्हटलं होतं. मात्र या सर्व शक्यता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी फेटाळून लावल्या आहेत. आज (5 फेब्रुवारी) मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. खारगे समितीतर्फे पार्थ पवार यांना कोणतीही क्लिन चीट मिळाली नसल्याचं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. त्या म्हणाल्या की, 'मुंढवा जमीन घोटाळ्या प्रकरणी पार्थ पवार यांना खारगे समितीनं कोणतीच क्लिन चीट दिलेली नाही. अजून समितीची शेवटची बैठक बाकी आहे. याविषयी माध्यमांमध्ये आलेल्या बातम्या धादांत खोट्या आहेत.' या पत्रकार परिषदेत त्या नेमकं काय म्हणाल्या, जाणून घेऊया.

हे वाचलं का?

हे ही वाचा : 'कोडगेपणा अनाकलनीय ...', 'मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील वाहतूक कोडींबाबत राज ठाकरेंचं सविस्तर भाष्य

सध्याची चार्जशीट फक्त शीतल तेजवाणीसाठीच

अंजली दमानिया म्हणाल्या की, 'पार्थ पवार यांचं नाव एफआयआरमध्ये का नाही याविषयी आमचा लढा आहे. आताच्या घटकेला शीतल तेजवानीला बेल मिळू नये यासाठी चार्जशीट दाखल करण्यात आली होती. ही चार्जशीट शीतल तेजवाणी पुरती सीमित होती. त्यात पार्थ पवारांचं नाव असण्याचा प्रश्नच नाही. म्हणून माझी माध्यमांना विनंती आहे की चुकीच्या बातम्या देऊ नका. पार्थ पवार यांना कोणतीही क्लिन चीट मिळालेली नाही.

'..तर मी हायकोर्टात जाणार'

या पत्रकार परिषदे दरम्यान दमानिया यांनी शीतल तेजवाणी आणि पार्थ पवार यांच्यात झालेल्या पॉवर ऑफ अॅटोर्नीची कागदपत्रंही अंजली दमानिया यांनी दाखवली. त्या म्हणाल्या की, यामध्ये प्रत्येक पानावर दोघांचं नाव आहे. इतकंच नाही, यामध्ये पार्थ पवार यांचा फोटो, त्यांची सही आहे. ही कागदपत्रं मी खारगे समितीला दिली आहेत. त्यामुळे पार्थ पवार यांना खारगे समिती बाहेर काढूच शकत नाही. जर समितीनं तसं काही केलं तर मी समितीला धारेवर धरणार आहे. सोबतच हायकोर्टापर्यंत जाणार आहे. कोणत्याही परिस्थितीत पार्थ पवार मुंढवा जमीन घोटाळ्यातून बाहेर येऊ शकत नाहीत.

सहानुभूतीचं कार्ड चालत नाही

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मृत्यूनंतर पार्थ पवार यांना सहानुभूती  मिळेल का असा प्रश्न यावेळी दमानियांना विचारण्यात आला. त्या म्हणाल्या की, 'कोणत्याही न्यायात सहानुभूतीचं कार्ड चालत नाही. हा जो घोटाळा पार्थ पवार यांनी केला आहे त्यातून ते सुटणं शक्यच नाही. या प्रकरणाची सगळी कागदपत्रं उपलब्ध आहेत. त्यामुळे सहानुभूतीने या गोष्टी मिटणार नाहीत.'

हे ही वाचा : पार्थ पवारांना मोठा दिलासा, मुंढवा जमीन खरेदी प्रकरणात निर्दोष? खारगे समितीच्या अहवालात नेमकं काय?

सुनेत्रा पवार यांना भेटणार का?

या प्रकरणासंबंधी सुनेत्रा पवार यांना भेटणार आहात का असा प्रश्न त्यांना विचारला गेला. याविषयी त्यांनी सांगितलं की, मी कोणाकडेही जाणार नाही. मला फक्त आता खारगे समितीच्या अहवालाची प्रतिक्षा आहे. खरं म्हणजे महाराष्ट्रात समित्या बनवणं बंद केलं पाहिजे. कोणत्याही समितीत खरा अहवाल सादर करण्याची धमक नाही. खारगे समितीचा अहवाल जर थातूर-मातूर निघाला तर मी न्यायालयात जाऊन लढा देईन. मात्र आता कोणत्याही प्रकारे सुनेत्रा पवार यांना भेटण्याची माझी इच्छा नाही.

    follow whatsapp