Black Box म्हणजे काय? अजितदादांच्या विमान अपघाताच्या तपास प्रक्रियेत किती महत्त्वाचा?

Ajit Pawar Plane Crash What is Black Box : फ्लाईट डेटा रिकॉर्डर आणि वैमानिकांच्या कॉकपिटमधील आवाज जतन करणाऱ्या उपकरणाला ब्लॅक बॉक्स असं म्हणतात. विमान उड्डाणापासून ते लँड होईपर्यंतच्या प्रवासातील संपूर्ण तांत्रिक माहिती यात नोंदवली जाते. ही सर्व माहिती डिजीटल स्वरूपात रेकॉर्ड होत असते. विशेष म्हणजे ब्लॅक बॉक्स काळ्या रंगाचा नसून केशरी रंगाचा असतो. अपघातानंतर सहज सापडावा यासाठी तो विमानाच्या मागील भागात बसवण्यात येतो.

Ajit Pawar Plane Crash What is Black Box

Ajit Pawar Plane Crash What is Black Box

मुंबई तक

• 05:42 PM • 06 Feb 2026

follow google news

बातम्या हायलाइट

point

Black Box म्हणजे काय?

point

अजितदादांच्या विमान अपघाताच्या तपासात किती महत्त्वाचा?

Ajit Pawar Plane Crash What is Black Box : महाराष्ट्रातील दिवंगत नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या तपासात ‘ब्लॅक बॉक्स’ हा अत्यंत महत्त्वाचा घटक ठरणार असल्याचं बोललं जात आहे. अपघातानंतर विविध दावे-प्रतिदावे, राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू असताना आता संपूर्ण तपासाची दिशा ब्लॅक बॉक्सच्या डेटाकडे वळली आहे. आमदार अमोल मिटकरी आणि खासदार बजरंग सोनवणे यांनी उपस्थित केलेले आक्षेप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेत्यांचे एकामागून एक दावे यामुळे या प्रकरणात खळबळ उडाली आहे. त्यामुळे ब्लॅक बॉक्समधून नेमकी कोणती माहिती समोर येते, याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलं आहे.

हे वाचलं का?

ब्लॅक बॉक्स म्हणजे नेमकं काय?

फ्लाईट डेटा रिकॉर्डर आणि वैमानिकांच्या कॉकपिटमधील आवाज जतन करणाऱ्या उपकरणाला ब्लॅक बॉक्स असं म्हणतात. विमान उड्डाणापासून ते लँड होईपर्यंतच्या प्रवासातील संपूर्ण तांत्रिक माहिती यात नोंदवली जाते. ही सर्व माहिती डिजीटल स्वरूपात रेकॉर्ड होत असते. विशेष म्हणजे ब्लॅक बॉक्स काळ्या रंगाचा नसून केशरी रंगाचा असतो. अपघातानंतर सहज सापडावा यासाठी तो विमानाच्या मागील भागात बसवण्यात येतो.

ब्लॅक बॉक्समधून काय सापडू शकतं?

ब्लॅक बॉक्समधून एअर ट्रॅफिक कंट्रोलसोबत वैमानिकांचे झालेले संभाषण, अपघाताच्या वेळी विमानात नेमकं काय घडलं होतं, दुर्घटनेसाठी कोणती कारणं जबाबदार ठरली, अपघात तांत्रिक बिघाडामुळे झाला की मानवी चुकीमुळे, याची माहिती मिळू शकते. याशिवाय कुठली उपकरणं बंद पडली होती का, हवामानाची स्थिती, ऑटो-पायलट स्टेटस, विमानाचा वेग, उंची, दिशा, इंधनसाठ्याची माहिती आणि बिघाडानंतर विमानात नेमकं काय घडलं, हे सर्व तपशील ब्लॅक बॉक्समधून स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

दादांच्या तपासात ब्लॅक बॉक्स महत्त्वाचा कसा?

अजित पवार यांच्या अपघाताच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडून विविध दावे केले जात आहेत. मंत्री छगन भुजबळ, आमदार अमोल मिटकरी आणि खासदार बजरंग सोनवणे यांनी केलेल्या दाव्यांमुळे या प्रकरणाला राजकीय वळण मिळालं आहे. मात्र, दावे काहीही असले तरी अपघाताचं खरं कारण ब्लॅक बॉक्सच्या डेटामधूनच समोर येईल, असं स्पष्ट होत आहे.

दादांच्या अपघाताचा तपास कुठवर आला?

अपघाताच्या चौकशीसाठी समिती गठित करण्यात आली आहे. डीजीसीएकडून आठ सदस्यीय समितीकडून या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. ही समिती 11 फेब्रुवारी रोजी प्राथमिक अहवाल जाहीर करणार आहे. याचबरोबर व्हीएसआर व्हेंचर्स या कंपनीच्या विशेष ऑडिटचेही आदेश देण्यात आले आहेत. या अहवालातून नेमकं काय समोर येणार, याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. सध्या तरी तपासाचा पुढचा टप्पा ब्लॅक बॉक्सच्या विश्लेषणावर अवलंबून असून, आता सर्वांनाच त्या ब्लॅक बॉक्सची प्रतीक्षा आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

"जिल्हाधिकाऱ्यांच्या मनमानीमुळे जव्हारच्या 200 बेड रुग्णालयाचा निधी HUDCO कडे परत जाण्याची नामुष्की!"
 

    follow whatsapp