Dharashiv News : धाराशिव जिल्ह्यात दिवाळी सणांत येडशी गावात दिवाळीच्या रात्री झालेल्या भीषण अग्नीतांडवाने प्रकरण चांगलं चिघळलं. यात सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला, अशातच प्रशासकीय व्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. या दुर्घटनेनंतर लोकप्रतिनीधींनी अग्निशमन विभागाच्या कार्यपद्धती तसेच कर्मचाऱ्यांच्या कामकाजावर अनेक प्रश्न उपस्थित केलेत.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : नवरा गावी गेला अन् बायको बॉयफ्रेंडसोबत खोलीत...
ठाकरे गटाचे आमदार प्रवीण स्वामींचा आरोप
अशातच आता उद्धव ठाकरे गटाचे आमदार प्रवीण स्वामी यांनी आरोप केला, अग्निशमन विभागाकडे परेसे ऑक्सिझन मास्क, सुरक्षा किट आणि जॅकेट उपलब्ध नव्हते. घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी राज्य सरकाकडे करण्यात आली आशी माहिती आहे.
कैलास पाटील काय म्हणाले?
अशातच आमदार कैलास पाटील यांनी म्हटलं की, अग्निशमन विभागाकडे आवश्यक असलेली उपकरणे तसेच वरच्या मजल्यावर अडकलेल्या चार जणांचे प्राण वाचवण्यात आले असते, त्याचप्रमाणे प्रत्येक तालुका स्तरावर आपत्ती व्यवस्थापन आणि एनडीआरएफचे पथक उपलब्ध करून देण्याची मागणी त्यांनी केली होती.
अग्निशमन दलाच्या कामकाजावर आमदार प्रतापसिंह यांच्याकडून प्रश्न
तर आमदार प्रतापसिंह यांनी अग्निशमन विभागाच्या विलंबावर आणि संसाधनांच्या कमतरतेवर अनेक प्रश्न उपस्थित केलेत. त्याच्या म्हणण्यानुसार, ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना रात्री सुमारे 2:40 वाजता घडल्याचे वृत्त आहे. मात्र, अग्निशमन दलाची गाडी सकळी चार वाजेपर्यंत घटनास्थळापर्यंत पोहोचली नव्हती. गाडीत डिझेल आणि पाण्याचीही पुरेशी व्यवस्था केली नव्हती, तसेच ग्रामस्थांनी डिझेल उलपब्ध करून दिले होते. हाच मुद्दा अधिवेशनात उपस्थित करून जबाबदार अधिकाऱ्यंवर कारवाईची मागणी करणार असल्याचे सांगितलं.
रोहित पवारांची यांनीही फेसबुक पोस्ट चर्चेत
राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनीही फेसबुक पोस्टच्या माध्यमातून या घटनेबद्दल दुःख व्यक्त केले. मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करत ही घटना अत्यंत दुर्दैवी आणि मन सुन्न करणारी असल्याचे त्यांनी म्हटले. स्थानिक नागरिकांनी अग्निशमन दलाची गाडी वेळेवर पोहोचली नसल्याचा आरोप केला आहे
धाराशिव नगर परिषदेचे नगरसेवक राहुल काकडे यांनी अग्निशमन विभागात प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्ती होणे आवश्यक असल्याचे सांगितले. यासाठी शासन स्तरावर प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. तसेच घटनेच्या चौकशीसाठी समिती स्थापन करून लवकरच अहवाल सादर केला जाईल, असे त्यांनी सांगितले.
मृतांच्या वारसांना आर्थिक मदतीसाठी शासनाकडे प्रस्ताव
दुसरीकडे, पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी या घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त करत जिल्हाधिकाऱ्यांना मृतांच्या वारसांना आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी तातडीने शासनाकडे प्रस्ताव पाठविण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच घटनेची सखोल चौकशी, दुर्घटनेत बचावलेल्या कुटुंबीयांना मानसिक आणि वैद्यकीय मदत तसेच भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी अग्निसुरक्षा व्यवस्था मजबूत करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या आहेत.
हे ही वाचा : कल्याणमध्ये घटनेचा थरार, दुचाकीतून पेट्रोलची गळती; फटाक्याच्या ठिणगीनं घेतला पेट
येडशी अग्निकांडामुळे पुन्हा एकदा जिल्ह्यातील अग्निशमन आणि आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. लोकप्रतिनिधींनी चौकशी आणि कारवाईची मागणी केली आहे. आता चौकशीत काय समोर येते आणि जबाबदारांवर काय कारवाई होते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
ADVERTISEMENT












