Mood Of The Nation : NDA सरकारची सर्वोत्कृष्ट कामगिरी कोणती? काय म्हणते जनता?

मुंबई तक

• 03:24 PM • 17 Aug 2021

देशातल्या 19 राज्यांमधील लोकांशी चर्चा करून इंडिया टुडेने एक सर्व्हे तयार केला आहे. या सर्व्हेमध्ये लोकांना विविध प्रश्न विचारण्यात आले. ऑगस्ट 2020, जानेवारी 2021 आणि ऑगस्ट 2021 या वर्षभराच्या कालावधीत हा सर्व्हे करण्यात आला. यामध्ये लोकांनी मोदी सरकारच्या काही निर्णयांबाबत नाराजी व्यक्त केली आहे. तर काही निर्णयांबाबत ते सर्वोत्कृष्ट असल्याचं म्हटलं आहे. आता आपण जाणून […]

Mumbaitak
follow google news

देशातल्या 19 राज्यांमधील लोकांशी चर्चा करून इंडिया टुडेने एक सर्व्हे तयार केला आहे. या सर्व्हेमध्ये लोकांना विविध प्रश्न विचारण्यात आले. ऑगस्ट 2020, जानेवारी 2021 आणि ऑगस्ट 2021 या वर्षभराच्या कालावधीत हा सर्व्हे करण्यात आला. यामध्ये लोकांनी मोदी सरकारच्या काही निर्णयांबाबत नाराजी व्यक्त केली आहे. तर काही निर्णयांबाबत ते सर्वोत्कृष्ट असल्याचं म्हटलं आहे. आता आपण जाणून घेणार आहोत की 19 राज्यांमधल्या लोकांना कोणते मुद्दे हे मोदी सरकारची सर्वोत्कृष्ट कामगिरी वाटत आहेत.

हे वाचलं का?

जाणून घ्या काय आहे लोकांचं म्हणणं?

सुप्रीम कोर्टाने राम मंदिराबाबत दिलेला निर्णय या निर्णयाला लोकांनी सर्वाधिक पसंती दिली आहे. ऑगस्ट 2021 मध्ये 29 टक्के लोकांना हा निर्णय पसंत पडला आहे. तर जानेवारी 2021 मध्ये 27 टक्के लोकांनी या निर्णयाला पसंती दर्शवली. ऑगस्ट 2020 या महिन्यात 13 टक्के लोकांनी या निर्णयाला पसंती दर्शवली आहे. राम मंदिराचा विषय हा गेल्या अनेक वर्षांपासून एक भावनिक विषय आहे. त्या वादग्रस्त जागी काय होणार हा प्रश्न 1992 पासून प्रलंबित होता त्याचा निकाल लागला आणि तो राम मंदिर होणार या बाजूने लागला हे लोकांना मोदी सरकारचं सर्वात मोठं यश वाटतं आहे.

काश्मीरमधून कलम 370 हटवणं हा लोकांना मोदी सरकारचा क्रमांक दोनचा सर्वोत्कृष्ट निर्णय वाटतो आहे. ऑगस्ट 2021 महिन्यात 22 टक्के, जानेवारी 2021 महिन्यात 20 टक्के तर ऑगस्ट 2020 महिन्यात 16 टक्के लोकांनी या निर्णयाला पसंती दर्शवली आहे.

मोदी सरकारने कोव्हिडची स्थिती कशी सांभाळली तर ती चांगली सांभाळली असं लोकांना वाटतं आहे यालाही ऑगस्ट 2021 मध्ये 12 टक्के लोकांनी, जानेवारी 2021 मध्ये 15 टक्के लोकांनी तर ऑगस्ट 2020 या महिन्यात 7 टक्के लोकांनी पसंती दर्शवली आहे. लोकांना वाटतं आहे की मोदी सरकार कोरोनाची दुसऱ्या लाटेचा सामना करण्यात यशस्वी ठरलं आहे. काही लोकांनी नाराजीही व्यक्त केली आहे. तर काही लोकांनी परिस्थिती योग्य पद्धतीने हाताळण्यात आली असंही म्हटलं आहे.

मेक इन इंडिया या योजनेला ऑगस्ट 2021 या महिन्यात 8 टक्के लोकांनी पसंती दर्शवली आहे. हे प्रमाण जानेवारी 2021 मध्ये 9 टक्के होतं तर ऑगस्ट 2020 या महिन्यात 2 टक्के होतं. नोटबंदीद्वारे काळा पैशांवर लगाम घातला हा निर्णय ऑगस्ट 2021 या महिन्यात 8 टक्के लोकांना पसंत पडला आहे. जानेवारी महिन्यातही 8 टक्के लोकांना पसंत पडला आहे तर ऑगस्ट 2020 या महिन्यात हे प्रमाण 6 टक्के होतं.

आत्मनिर्भर भारतचा नारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना काळात दिला होता. याबाबतचं प्रमाण गेल्यावर्षी ऑगस्ट महिन्यात फक्त 1 टक्का होतं. तर ते जानेवारी आणि ऑगस्ट 2021 या महिन्यांमध्ये 8 टक्के इतकं झालं आहे. भ्रष्टाचारमुक्त सरकार आहे असं वाटतं का? याबाबत मात्र प्रमाण कमी झालेलं दिसतं आहे. ऑगस्ट 2020 मध्ये 8 टक्के लोकांना सरकार भ्रष्टाचार मुक्त आहे असं वाटत होतं. मात्र जानेवारी आणि ऑगस्ट 2021 मध्ये हे प्रमाण 5 टक्के इतकंच राहिलं आहे. नवे कृषी कायदे हा निर्णयही जानेवारी 2021 मध्ये 3 टक्के लोकांना आणि ऑगस्ट 2021 मध्ये 4 टक्के लोकांना पटला आहे.

    follow whatsapp