MP Sanjay Jadhav : आधी ठाकरेंना घरचा आहेर अन् आता 48 तासांत घुमजाव…

मुंबई तक

06 Mar 2023 (अपडेटेड: 26 Mar 2023, 04:58 PM)

MP Sanjay Jadhav U Turn on Thackarey Statement : राज्यात एकीकडे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने शिवगर्जना मोहिम हाती घेऊन शिंदेसह बंडखोर आमदार आणि निवडणूक आयोगाच्या निर्णयावर टीका करून जनतेमध्ये सहानूभूती निर्माण करण्याचा प्रयत्न सुरु केला असतानाच,ठाकरे गटाचा एक खासदार बंडाची तयारी करत असल्याची चर्चा सुरू झाली आहे. या खासदाराने आधी थेट उद्धव ठाकरेंवर (Uddhav Thackeray) […]

Mumbaitak
follow google news

MP Sanjay Jadhav U Turn on Thackarey Statement : राज्यात एकीकडे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने शिवगर्जना मोहिम हाती घेऊन शिंदेसह बंडखोर आमदार आणि निवडणूक आयोगाच्या निर्णयावर टीका करून जनतेमध्ये सहानूभूती निर्माण करण्याचा प्रयत्न सुरु केला असतानाच,ठाकरे गटाचा एक खासदार बंडाची तयारी करत असल्याची चर्चा सुरू झाली आहे. या खासदाराने आधी थेट उद्धव ठाकरेंवर (Uddhav Thackeray) प्रहार करत खदखद व्यक्त केली होती, त्यानंतर आता 48 तासात घुमजाव घेतला आहे, त्यामुळे संजय जाधवांच्या (sanjay jadhav) मनात चाललंय तरी काय असा प्रश्न राजकिय नेत्यांना पडलाय. (mp sanjay jadhav criticize thackarey and now u turn on statement nanded shivgarjana)

हे वाचलं का?

बापट फॅक्टर! शरद पवारांनी सांगितली रवींद्र धंगेकरांच्या विजयाची कारणं

ठाकरे पिता-पुत्रावर टीका

तुम्हाला (उध्दव ठाकरे ) (Uddhav Thackeray) मुख्यमंत्री व्हायचं होतं, तर तुम्ही पोराला मंत्री करायला नको हवं होतं. पोराला मंत्री करायचं होतं. तर तुम्ही मुख्यमंत्री व्हायला नको होतं, ही वस्तुस्थिती होती. दोघांनी खुर्च्या अटकवल्यामुळे एकनाथ शिंदे यांनी वेगळी चूल मांडली आणि याच भूमिकेतून गद्दारी झाली, असे विधान ठाकरे गटाचे परभणीचे खासदार संजय जाधव यांनी करत उध्दव ठाकरेंना घरचा आहेर दिला होता. तसेच महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये उद्धव ठाकरेंनी ज्या पद्धतीने पक्षाकडे लक्ष द्यायला पाहिजे होते, त्या पद्धतीने त्यांनी दिले नाही, त्यामुळे आमच्यावर ही परिस्थिती ओढवल्याचा आरोपही त्यांनी केला. हिंगोलीच्या औंढा नागनाथ मध्ये पार पडलेल्या शिवगर्जना मेळाव्यात खासदार जाधव बोलत होते. जाधव यांच्या या विधानानंतर ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde)गटाच्या संपर्कात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.

पन्नास खोके, शंभर खोके माझ्या खुर्चीसमोर ठेंगणे

पन्नास खोके काय, शंभर खोके आले तरी माझ्या खुर्ची समोर ठेंगणे वाटतील. पक्षाशी बेईमानी करणे माझ्यात रक्तात नाही,असे विधान करत खासदार जाधव यांनी घुमजाव घेतला. मी सामान्य कुटुंबातील शेतकऱ्याचा मुलगा आहे. माझ्या मागे कुठली ही राजकीय पार्श्वभूमी नाही आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमुळेच मला परभणीमध्ये सर्व पदावर काम करण्याची संधी मिळाली. सात जन्मही मी या पक्षाचे उपकार फेडू शकणार नाही, तेवढं मला पक्षाने दिले आहे. त्यामुळे ज्या पक्षाने मला वाढवलं त्या पक्षासोबत पाईक रहाने माझे कर्तव्य आहे, असे वक्तव्य करून खासदार जाधव यांनी ठाकरे पिता-पुत्रांच्या टीकेवर सारवासारव केली आहे. तसेच परभणी जिल्हात ठाकरे गटाची शिवसेना साबूत राहणार असा विश्वास देखील जाधव यांनी व्यक्त केला. नांदेडमध्ये रविवारी पार पडलेल्या शिवगर्जना सभेत ते बोलत होते.

नाना पटोलेंच्या भावावर काँग्रेस नेत्याच्या अपहरणाचा आरोप, काय आहे प्रकरण?

दरम्यान ठाकरेंना घरचा आहेर दिल्यानंतर 48 तासांत घुमजाव घेतल्याने संजय जाधव यांची चर्चा राजकिय वर्तुळात सुरु झाली आहे. तसेच संजय जाधव बंडाची तयारी करत असल्याचीही चर्चा आहे.मात्र पिता-पुत्रांवरील टीकेवर घुमजाव घेतल्याने संजय जाधव यांच चाललं काय आहे, असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

    follow whatsapp