Mumbai Crime : मुंबईतून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका तरुणीने प्रियकराच्या त्रासाला कंटाळून जीवन संपवलं. मृत तरुणीचं नाव स्तुती सोनवणे (वय 24) असे आहे. ही घटना मुंबईतील अँटॉप हिल परिसरात घडली आहे. पोलिसांनी तपास सुरू केला असून मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आल्याचे वृत्त आहे. या घटनेनं तिच्या कुटुंबातील लोकांना मोठा धक्का बसला आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : इराण आणि इस्रायल युद्धाचा भडका थेट LPG गॅस सिलिंडरवर, 25 दिवसांपूर्वी संपला तर काय करावं?
मेडिकलचं शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीने घरात गळफास घेत जीवन संपवलं
या प्रकरणाची अधिक माहिती पोलिसांनी सांगितली की, नवी मुंबईतील एका महाविद्यालयात एमडीएसची पदवी घेत असलेल्या विद्यार्थिनीने घरी स्कार्फने गळफास घेत जीवन संपवलं. घटनास्थळी पोलिसांना सहा पानांची सुसाईड नोट आढळली, ज्यात तिच्या प्रियकरावर गंभीर आरोप करण्यात आले होते.
अँटॉप हिल पोलिसांनी अपघाची मृत्यूचा गुन्हा दाखल करून प्रकरणाचा तपास सुरु केला. सुसाईड नोटमध्ये विद्यार्थिनीने लिहिलं की, तिचा बॉयफ्रेंड मोहम्मद फौझिल तिच्या चारित्र्यावर संशय घेत होता. सुसाईड नोटमध्ये श्रद्धा वालकर हत्याकांडाचा देखील संदर्भ देण्यात आला होता.
सुसाईड नोटमध्ये काय?
सुसाईड नोटमध्ये लिहिलं की, तिच्या मैत्रिणी तिला अनेकदा चेष्टेत म्हणाले की, 'एक दिवस तू आम्हाला फ्रिजमध्ये सापडशील', सुसाईड नोटनुसार सुरुवातीला दोघांमधील संबंध चांगले होते, पण नंतर वाद होऊ लागले होते.
हे ही वाचा : फेमस रील स्टार अरुण तुपेचं निधन, छत्रपती संभाजीनगरमध्ये हळहळ, घरातच मृतावस्थेत आढळला
विद्यार्थिनी ही आपली आई-वडील आणि बहिणीसोबत एंटॉप हिल येथे राहत होती. सकाळी 11 वाजून गेल्यानंतरही खोलीतून बाहेर पडली नव्हती. कुटुंबीयांनी भलताच संशय आला. त्यांनी दरवाजा तोडला असता, पीडित मुलीनं गळफास घेतल्याचे आढळून आले होते. त्यानंतर तिला मुंबईतील सायन रुग्णालयात दाखल केले असता, डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.
ADVERTISEMENT











