मुंबई: 13 मजली इमारतीला भीषण आग, 3 मुलांसह 9 जण जखमी

मुंबई तक

• 01:38 PM • 20 Oct 2026

Mumbai News : मुंबईतील कुर्ला पश्चिम येथील कोहिनूक एचडीआयएल इमारत क्रमांक 5 मध्ये मंगळवारी पहाटे भीषण आग लागली. या दुर्दैवी घटनेत तीन मुलांसह 9 जण गंभीररित्या जखमी झाल्याचे वृत्त आहे.

Mumbai news

Mumbai news

Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

13 मजली इमारतीच्या इलेक्ट्रिक डक्टला भीषण आग

point

आठ जण गंभीर भाजले गेले असून रुग्णालयात उपचार सुरू 

Mumbai News : मुंबईतील कुर्ला पश्चिम येथील कोहिनूक एचडीआयएल इमारत क्रमांक 5 मध्ये मंगळवारी पहाटे भीषण आग लागली. या दुर्दैवी घटनेत तीन मुलांसह 9 जण गंभीररित्या जखमी झाल्याचे वृत्त आहे. इलेक्ट्रिक डक्टमध्ये ही भीषण आग लागली होती, ही आग सुमारे 28 मिनिटांत नियंत्रणात आणण्यात आली होती. जखमींना तात्काळ राजावडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, सध्या त्यांची प्रकृत ही स्थिर असल्याची माहिती आहे. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : बांगलादेशचं नाव घेत सत्ता बदलावर मोहन भागवत यांचं मोठं विधान

13 मजली इमारतीच्या इलेक्ट्रिक डक्टला भीषण आग

अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, 13 मजली निवासी इमारतीच्या एका इलेक्ट्रिक डक्टला आग लागली होती. कुर्ला पश्चिम येथील कोहिनूर एचडीआयएल इमारत क्रमांक 5 मध्ये सुमारे 6:56 वाजण्याच्या सुमारास ही आग लागली होती. ही आग पुढे पसरली गेल्यानंतर अग्निशमन दलाने सकाळी 7:21 वाजेपर्यंत आगीवर नियंत्रण मिळवले तरीही, तीन मुलांसह इतर नऊ जण गंभीरपणे जखमी झाल्याची माहिती समोर आली. 

आठ जण गंभीर भाजले गेले असून रुग्णालयात उपचार सुरू 

दरम्यान, महापालिका अधिकाऱ्यांनी सांगितलं की, इमारतीत दाट धूर पसरल्याने श्वास घेण्यास त्रास होत असलेल्या आठ जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. एका व्यक्तीच्या उजव्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. जखमींमध्ये एका पाच वर्षांच्या मुलाचा आणि दोन किशोरवयीन मुलींचा देखील समावेश आहे. सर्वांना राजावाडी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून प्रकृती स्थिर असल्याची माहिती समोर आली. 

हे ही वाचा : नालासोपारा: गरबा खेळताना तरुणाने मुलीची काढली छेड, Video व्हायरल

अधिकाऱ्यांनी सांगितलं की, मदतीसाठी मुंबई अग्निशमन दल, पोलीस वीज कंपनी, 108 रुग्णवाहिका सेवा आणि वॉर्ड कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते. तसेच आगीचे कारण सध्या अज्ञात असून पुढील तपास सुरू करण्यात आलाय.