साताऱ्यात नरबळीचा प्रकार? युवकाचा मृतदेह अघोरी जखमांसह आढळल्याने खळबळ

मुंबई तक

24 May 2022 (अपडेटेड: 01 Mar 2023, 09:06 AM)

इम्तियाज मुजावर, प्रतिनिधी, सातारा साताऱ्यातल्या जिल्ह्यातील जावळी तालुक्यातल्या शेते गावात अविनाश मेंगळे या तरूणाचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. त्याच्या मृतदेहावर अघोरी जखमा झाल्याने त्याचा मृत्यू नरबळी असल्याचा संशय त्याच्या कुटुंबीयांनी व्यक्त केला आहे. अविनाश मेंगळे असं मृत्यू झालेल्या तरूणाचं नाव आहे. काय घडली घटना? अविनाश मेंगळे या तरूणाचा मृत्यू झाला. मात्र या मृतदेहावर जखमा आहेत. […]

mumbaitak

mumbaitak

follow google news

इम्तियाज मुजावर, प्रतिनिधी, सातारा

हे वाचलं का?

साताऱ्यातल्या जिल्ह्यातील जावळी तालुक्यातल्या शेते गावात अविनाश मेंगळे या तरूणाचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. त्याच्या मृतदेहावर अघोरी जखमा झाल्याने त्याचा मृत्यू नरबळी असल्याचा संशय त्याच्या कुटुंबीयांनी व्यक्त केला आहे. अविनाश मेंगळे असं मृत्यू झालेल्या तरूणाचं नाव आहे.

काय घडली घटना?

अविनाश मेंगळे या तरूणाचा मृत्यू झाला. मात्र या मृतदेहावर जखमा आहेत. सदर मृतदेहाची नखं उपटण्यात आली आहेत तसंच पायाची बोटं जाळण्यात आली आहेत. त्यामुळे हा प्रकार नरबळी किंवा घातपाताचा असावा असा संशय व्यक्त करण्यात आला आहे. यामुळे जावळी तालुक्यात एकच खळबळ माजली आहे. या संदर्भात अविनाश मेंगळेच्या कुटुंबीयांनी आरपीआयचे तालुका अध्यक्ष संजय गाडे यांची भेट घेतली आणि त्यांना निवेदन दिलं.

Washim: तपासादरम्यान पोलिसांचा कुत्रा भुंकला आणि बिंग फुटलं, वडिलांची हत्या करणारा मुलगा अटकेत

निवेदनात दिलेल्या माहितीप्रमाणे अविनाश मेंगळे आणि त्याचे दोन मित्र सत्यवान भोसले आणि निलेश साळुंखे बाहेर जाऊन येऊ असं सांगत अविनाशला घरातून घेऊन गेले होते. त्यानंतर दुपारच्या वेळेस अविनाशची पत्नी रेश्मा हिने अविनाशला फोन केला होता, अविनाशने एक तासात घरी येतो असे सांगितले मात्र दोन तासाने अविनाशचा मृतदेह त्याचे मित्र सत्यवान आणि निलेश घेऊन आले.

अविनाशला हार्ट अटॅक आला आणि त्यात त्याचा मृत्यू झाला अशी माहिती या दोन मित्रांनी दिली. त्याचा मृतदेह पाहून त्याची पत्नी आणि आई बेशुद्ध पडल्या. त्यांना उपचारांसाठी दवाखान्या नेण्यात आलं. तसंच अविनाशचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या दोन मित्रांनी घाईने त्याच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार केले अशीही माहिती या निवेदनात त्याच्या पत्नीने दिली आहे.

धक्कादायक… सैतानाचा अवतार समजून सुनेला नग्नावस्थेत करायला लावली पूजा, बळी घेण्याचाही प्रयत्न

या घटनेनंतर अविनाशचा मृतदेह धोमजवळच्या उजव्या कॅनॉलमधून बाहेर काढत असताना त्याचे दोन मित्र दिसत असल्याचे फोटो व्हायरल झाले आहेत. सोशल मीडियावर अविनाश मेंगळेच्या मृतदेहाचे हे फोटो व्हायरल झाले. त्यात सत्यवान भोसले आणि निलेश साळुंखे हे त्या फोटोत दिसत आहेत. सोशल मीडियावर हे फोटो व्हायरल झाल्यानंतर अविनाशच्या पत्नीने गाडे यांच्याकडे निवेदन दिलं. दरम्यान हे फोटो व्हायरल झाल्यानंतर निलेश साळुंखे आणि सत्यवान भोसले हे दोघेही फरार झाले आहेत.

या सगळ्यामुळे संशयाचं वातावरण तयार झालं आहे. अविनाशच्या मृतदेहावर जखमा होत्या, तसंच त्याच्या पायाची नखं काढण्यात आली होती आणि बोटं जाळण्यात आली होती असंही त्याच्या पत्नीने सांगितलं आहे. त्यामुळे हा नरबळीचा प्रकार असावा असाही संशय अविनाशच्या कुटुंबाने व्यक्त केला आहे. यानंतर आरपीआयचे तालुका अध्यक्ष गाडे यांनी कुटुंबाला घेऊन पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि सदर प्रकरणी तक्रार नोंदवली आहे. पोलिसांनी चौकशी करून नेमका हा खून आहे घातपात आहे की नरबळीचा प्रकार आहे याचा खुलासा करावा अन्यथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गवई गट यांच्या माध्यमातून आंदोलन छेडण्याचा इशारा जिल्हाध्यक्ष संजय गाडे यांनी दिला आहे.

    follow whatsapp