राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची अहमदाबादमध्ये भेट झाल्याच्या बातम्या काही दिवसांपासून प्रसारमाध्यमांमधून समोर येत होत्या. राष्ट्रवादीचे राज्यसभा खासदार प्रफुल पटेल देखील यावेळी हजर असल्याचं समोर येत होतं. परंतू राष्ट्रवादी काँग्रेसने शाह-पवार भेटीच्या सर्व बातम्या फेटाळून लावल्या आहेत. राज्याचे कॅबिनेट मंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी पवार-शाह भेटीच्या बातम्या अफवा असल्याचं स्पष्ट केलंय.
ADVERTISEMENT
पवारांच्या भेटीवर अमित शाहंचं सूचक विधान, म्हणाले…
“गेल्या दोन दिवसांपासून ट्विटरवर अमित शाह आणि शरद पवार यांच्या भेटीविषयी काही बातम्या पसरवल्या जात आहेत. पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना अमित शाह यांनीही संभ्रम वाढवण्याचा प्रयत्न केला. परंतू या सर्व बातम्या खोट्या आहेत, अशी कोणतीही भेट झालेली नाही.” दोन्ही नेत्यांची आता भेट होईल असं काहीच कारण नसल्याचं मलिक यांनी स्पष्ट केलं.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि प्रफुल्ल पटेल यांनी अहमदाबादमध्ये एका बड्या उद्योगपतीची भेट घेतल्याचं कळतंय. पवार आणि पटेल यांची उद्योगपती गौतम अदानी यांच्याशी भेट झाली. महत्त्वाचं म्हणजे पवार आणि पटेल यांचा हा दौर पूर्वनियोजित होता. केवडिया येथील साखर संमेलनात दोघंही सहभागी होणार होते.
‘अनिल देशमुखांना अपघातानं मिळालं गृहमंत्रीपद’, सामनातून शिवसेनेचा गौप्यस्फोट
पण हा पूर्वनियोजित कार्यक्रमच झाला नाही. पण पवार आणि पटेल यांची अदानी यांच्याशी भेट मात्र झाली. या भेटीनंतर दोघंही शनिवारी सकाळी ११ च्या सुमारा मुंबईला परतले.
या भेटीने राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना वेग आलाय. या चर्चांमध्ये आता पवार आणि पटेल यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनाही भेटल्याचं कळतंय. त्यामुळे पवार आणि पटेल यांच्या अहमदाबाद दौऱ्याबद्दल आणखी वेगवेगळ्या शक्यतांचं पेव फूटलंय.
ADVERTISEMENT
