MOTN Survey 2025, CM Devendra Fadnavis : देशातील सर्वात लोकप्रिय मुख्यमंत्री कोण? असा प्रश्न अनेकांना पडला असेल. याच प्रश्नाचं उत्तर इंडिया टुडे-सी व्होटरच्या मूड ऑफ द नेशन सर्व्हेच्या माध्यमातून समोर आलं आहे. या सर्व्हेच्या माध्यमातून जनतेनं आश्चर्यकारक मतं व्यक्त केली आहेत. उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे सर्वात जास्त लोकप्रिय मुख्यमंत्री असल्याचं 36%लोकांनी म्हटलं आहे. दरम्यान, आपापल्या राज्यात कोण जास्त लोकप्रिय आहे, असा प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा जनतेनं हिमंता बिस्वा सरमा आणि प्रेम सिंह तमांग बाजी यांना सर्वाधिक पसंती दर्शवण्यात आली आहे.
ADVERTISEMENT
देशात सर्वात चांगली कामगिरी करणारा मुख्यमंत्री कोण?
मूड ऑफ द नेशन सर्व्हेच्या माध्यमातून एकूण 2 लाख 6 हजार 826 लोकांचं मत जाणून घेण्यात आलं आहे. यामध्ये देशातील सर्व राज्ये आणि लोकसभा विभागांचा समावेश आहे. 1 जुलै ते 14 ऑगस्ट 2025 पर्यंत हा सर्व्हे घेण्यात आला. यामध्ये प्रत्येक वयोगटातील, जाती धर्मातील 54 हजार 788 लोकांनी सहभाग घेतला होता. मागील 24 आठवड्यांमध्ये 1 लाख 52 हजार 38 लोकांच्या विश्लेषणाचाही यात समावेश करण्यात आला आहे.
भाजपमध्ये पंतप्रधानपदाचा दावेदार कोण?
पीएम मोदींनंतर भाजपमध्ये पंतप्रधानपदाचा दावेदार म्हणून तीन नेत्यांची नाव निश्चित केली होती. सर्व्हेमध्ये अशी माहिती समोर आली की, 28 टक्के लोकांनी अमित शाहा यांना पाठिंबा दर्शवला आहे. त्यामुळे जनतेच्या सपोर्टमुळे ते या शर्यतीत पुढे असल्याचं पाहायला मिळत आहे. तर दुसरा पर्याय म्हणून उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ होते. 26 टक्के लोकांनी त्यांना पुढचा पंतप्रधानपदाचा दावेदार म्हणून निवडलं आहे. तर तिसरा पर्याय म्हणून नितीन गडकरी यांना सर्वात कमी समर्थन मिळाल्याचं समोर आलंय. त्यांना फक्त 7 टक्के लोकांचं समर्थन मिळालं आहे.
हे ही वाचा >> Maratha Reservation: मनोज जरांगे मुंबईत येताच CM फडणवीस काय म्हणाले?, मुख्यमंत्र्यांचा प्रत्येक शब्द जसाच्या तसा...
पुढील पंतप्रधानपदाचा दावेदार कोण?
पंतप्रधानपदासाठी सर्वात प्रबळ दावेदार कोणता नेता असू शकतो? असा प्रश्न MOTN सर्व्हेमध्ये विचारण्यात आला. यावर 52 टक्के लोकांनी म्हटलंय की, नरेंद्र मोदी अजूनही पंतप्रधानपदासाठी सक्षम आहेत.
ADVERTISEMENT
