MOTN Survey 2025 Latest Update : काँग्रेस पक्षावर विरोधी पक्षांकडून नेहमीच आरोप केला जातो की, गांधी कुटुंबियांची ही पार्टी आहे. काँग्रेसने मल्लिकार्जून खरगे यांना अध्यक्ष बनवलं आणि सगळ्यांना संदेश दिला की, काँग्रेस पक्ष कोणत्याही एका कुटुंबाचा पक्ष नाहीय. ऑगस्ट 2025 च्या मूड ऑफ द नेशन सर्व्हेमध्ये विरोधी पक्षांचं राजकारण आणि काँग्रेसच्या परिस्थितीबाबत सर्व्हे करण्यात आला. या सर्व्हेच्या माध्यमातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. सर्व्हेनुसार, काँग्रेस पक्ष आणि राहुल गांधी यांचं विरोध पक्षातील काम दिवसेंदिवस मजबूत होत आहे.
ADVERTISEMENT
विरोध पक्षाचं नेतृत्व कोणी करावं?
सर्व्हेमध्ये प्रश्न विचारण्यात आला की, आताच्या घडीचे विरोधी पक्ष नेत्यांमध्ये आघाडीचं नेतृत्व करण्याची सर्वात जास्त क्षमता कोणामध्ये आहे? या प्रश्नाचं उत्तर देताना, 28.2 % लोकांनी राहुल गांधी यांचं नाव घेतलं. फेब्रुवारी 2025 च्या तुलनेत हा आकडा आणखी वाढला आहे. ममता बॅनर्जी यांना 7.7 %, अखिलेश यादव यांना 6.7 % आणि अरविंद केजरीवाल यांना 6.4 % समर्थन मिळालं आहे.
विरोधी पक्षनेता म्हणून राहुल गांधी यांची कशी आहे कामगिरी?
लोकसभेत विरोध पक्षनेता म्हणून राहुल गांधी यांची कामगिरी उत्कृष्ट असल्याचं 27.9 % लोकांनी म्हटलं आहे. तर 22.4 % लोकांनी म्हटलंय, राहुल गांधी यांची कामगिरी चांगली आहे. तर 14.7 % लोकांनी राहुल गांधी यांची कामगिरी खराब असल्याचं म्हटलं आहे. 12.3 टक्के लोक म्हणाले, राहुल गांधी यांची कामगिरी अतिशय खराब आहे.
हे ही वाचा >> देशात आता निवडणुका झाल्या, तर कोणाचं सरकार येणार? BJP की Congress? खळबळ उडवून टाकणारा MOTN सर्व्हे वाचा एकदा
देशात खरा विरोधी पक्ष कोणता आहे?
सर्व्हेमध्ये 66.4 % लोकांनी म्हटलंय, काँग्रेसच खरा विरोधी पक्ष आहे. 26.8 % लोकांनी म्हटलंय की, विरोधी पक्ष म्हणून काँग्रेस पक्ष उत्कृष्ट आहे. तर 20.4 % लोकांनी म्हटलंय, विरोधी पक्ष म्हणून काँग्रेस पक्ष चांगला आहे. तर 17.09 % लोकांनी म्हटलंय की, विरोधी पक्ष म्हणून काँग्रेस पक्ष चांगला नाही.
काँग्रेसचं नेतृत्व करण्यासाठी सर्वात चांगला नेता कोण?
काँग्रेसच्या नेतृत्त्वाबाबत राहुल गांधी यांना जनतेनं मोठा पाठिंबा दिला आहे. 38.3 % लोकांनी त्यांना पार्टीचा सर्वात महत्त्वाचा नेता असल्याचं म्हटलं आहे. सचिन पायलट यांना 8.8 %, प्रियांका गांधी यांना 7% आणि शशी थरूर यांना 4.6% लोकांनी समर्थन दर्शवलं आहे.
गांधी घराणं सोडून सर्वात आवडता नेता कोण?
गांधी घराणं सोडून सर्वात जास्त पसंती सचिन पायटल यांना देण्यात आली आहे. सर्व्हेनुसार, सचिन पायलट यांना 16.4 % व्होट्स देण्यात आले आहेत. तर मल्लिकार्जून खरगे यांना 12.4 % आणि शशी थरुर यांना 8.4 टक्के लोकांनी पाठिंबा दर्शवला आहे.
ADVERTISEMENT
