Maratha Protest : मराठा आंदोलक अखेर मुंबईच्या आझाद मैदानावर आज 29 ऑगस्ट रोजी सकाळी धडकले आहेत. सोबत लाखों मराठा बांधवांनीही पाटलांनी जरांगेंना साथ दिली आहे. तसेच आंदोलन सुरु केलं आहे. असंख्य मराठा बांधव हे छत्रपती शिवाजी महाराजांची घोषणाबाजी करत आहेत. तर हरहर महादेव अशाही घोषणाबाजी करत आहेत. आझाद मैदानावर मराठा आंदोलकांच्या येण्यानं वातावरण पूर्णपणे भगवं झालं आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : बुधादित्य योग निर्माण होतोय, 'या' राशीतील लोकांना पैशाची कसलीच कमी भासणार नाही, काय सांगतं राशीभविष्य?
बुधवारपासूनच मराठा बांधवांनी मुंबईकडे कूच केली होती. त्यानंतर गुरूवारी रात्रीपासून मोठ्या प्रमाणात मराठा बाधवांनी आझाद मैदानावर मुक्काम केला आहे. सध्या आझाद मैदानावर मराठा बांधवांच्या मनात आरक्षणाच्या मुद्द्यावरून आग पेटलेली दिसून येत आहे. मराठा बांधवांनी आंदोलनाविषयी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.
काही आंदोलकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. ते म्हणाले की,
एका आंदोलकानं म्हटलं की, आम्हाला गरज पडल्यास आम्ही उरले सुरले कुटुंबातील लोकांनाही मुंबईत आणू आणि मुंबई आम्ही जाम करू टाकू, पण आम्ही मागे हटणार नाही, तर दुसरा आंदोलक म्हणाला की, मनोजदादा जरांगेंच्या नेतृत्वात आम्ही लोकशाही पद्धतीने आंदोलन करण्याचा प्रयत्न करतोय, पण इशारा देतोय, आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय मुंबई सोडणारच नसल्याचं म्हणत त्यांनी संताप व्यक्त केला आहे.
हे ही वाचा : MOTN Survey : आताच्या घडीला निवडणुका झाल्या, तर NDA जिंकणार 324 जागा..BJP ला बहुमत मिळणार नाही, कारण..
दोघांचा मृत्यू
दरम्यान, मुंबईकडे कूच करताना दोन मराठा बांधवांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी एका मराठा बांधवाचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्याचं नाव सतीश ज्ञानोबा देशमुख (वय 45) असे आहे. तर दुसऱ्या एका तरुण मराठा बांधवाचे नाव गोपीनाथ कोलते असे आहे. गोपीनाथ कोलते यांनी आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे.
ADVERTISEMENT
