काँग्रेस नेत्याची आमदारकी रद्द, उच्च न्यायालयाने भाजपच्या पराभूत उमेदवाराला आमदार करुन टाकलं, नेमकं कारण काय?

मुंबई तक

10 Mar 2026 (अपडेटेड: 10 Mar 2026, 08:40 AM)

MP Politics : भाजप नेते आणि माजी मंत्री रामनिवास रावत यांनी उच्च न्यायालयात निवडणूक याचिका दाखल केली होती. मुकेश मल्होत्रा यांनी पोटनिवडणुकीदरम्यान आपल्या नामांकन अर्जात गुन्हेगारी रेकॉर्डची माहिती लपवल्याचा आरोप या याचिकेत करण्यात आला होता. मल्होत्रा यांच्यावर 6 गुन्हेगारी गुन्हे दाखल होते, ज्याचा उल्लेख त्यांनी आपल्या प्रतिज्ञापत्रात केला नव्हता, अशी माहिती रावत यांनी न्यायालयाला दिली होती.

MP Politics

MP Politics

Google CTA

बातम्या हायलाइट

point

काँग्रेस नेत्याची आमदारकी रद्द

point

उच्च न्यायालयाने भाजपच्या पराभूत उमेदवाराला आमदार करुन टाकलं, नेमकं कारण काय?

MP Politics : मध्य प्रदेशातील विजयपूर विधानसभा मतदारसंघाच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली आहे. ग्वाल्हेर उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने काँग्रेस आमदार मुकेश मल्होत्रा यांची निवडणूक रद्द  केली आहे. न्यायालयाने केवळ मल्होत्रा यांची निवडच रद्द केली नाही, तर या प्रकरणातील याचिकाकर्ते आणि पोटनिवडणुकीत दुसऱ्या क्रमांकावर राहिलेले भाजप नेते रामनिवास रावत यांना विजयपूरचे नवे आमदार म्हणून घोषित करण्याचे आदेश दिले आहेत.

हे वाचलं का?

नेमके प्रकरण काय?

भाजप नेते आणि माजी मंत्री रामनिवास रावत यांनी उच्च न्यायालयात निवडणूक याचिका दाखल केली होती. मुकेश मल्होत्रा यांनी पोटनिवडणुकीदरम्यान आपल्या नामांकन अर्जात गुन्हेगारी रेकॉर्डची माहिती लपवल्याचा आरोप या याचिकेत करण्यात आला होता. मल्होत्रा यांच्यावर 6 गुन्हेगारी गुन्हे दाखल होते, ज्याचा उल्लेख त्यांनी आपल्या प्रतिज्ञापत्रात केला नव्हता, अशी माहिती रावत यांनी न्यायालयाला दिली होती.

हेही वाचा : पीडित महिलेला झोपडीत बोलावले, नंतर प्रायव्हेट पार्टमध्ये दांडकं घालून... जादूटोण्याचा संशय अन् महिलेचा बळी

न्यायालयाचा निकाल

न्यायमूर्ती जी. एस. अहलुवालिया यांच्या खंडपीठाने या प्रकरणाची सुनावणी करताना महत्त्वपूर्ण तथ्ये लपवणे हे निवडणूक कायद्याचे उल्लंघन असल्याचे मानले. त्यानुसार, मुकेश मल्होत्रा यांची निवड अमान्य ठरवत रामनिवास रावत यांना नवा आमदार म्हणून घोषित केले. या आदेशामुळे आता विजयपुरमध्ये पुन्हा पोटनिवडणुकीची गरज उरलेली नाही, तर रावत थेट आमदार म्हणून जबाबदारी स्वीकारतील.

रामनिवास रावत यांचा राजकीय प्रवास 

 2023 ची विधानसभा निवडणूक त्यांनी काँग्रेसच्या तिकिटावर जिंकली होती. मात्र, 2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि मोहन यादव सरकारमध्ये त्यांना कॅबिनेट मंत्री करण्यात आले. त्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत त्यांना पराभव पत्करावा लागला आणि मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. या पराभवानंतर त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती.

मुकेश मल्होत्रा कोण आहेत? 

मल्होत्रा हे भागातील वजनदार आदिवासी नेते मानले जातात. त्यांनी यापूर्वी भाजप सरकारमध्ये राज्यमंत्रीपद भूषवले होते. 2023 मध्ये त्यांनी अपक्ष निवडणूक लढवून 45 हजार मते मिळवली होती. त्यानंतर मे 2024 मध्ये प्रियंका गांधी यांच्या उपस्थितीत त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. 

या निर्णयामुळे विजयपूरची जागा आता काँग्रेसच्या हातातून निसटली आहे. या निकालाच्या विरोधात काँग्रेस आता सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्याची शक्यता आहे. मात्र, सध्या तरी रामनिवास रावत यांच्यासाठी हा निकाल मोठी संजीवनी ठरला आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

पीडित महिलेला झोपडीत बोलावले, नंतर प्रायव्हेट पार्टमध्ये दांडकं घालून... जादूटोण्याचा संशय अन् महिलेचा बळी