Sanjay Raut : शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप करत सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले आहे. मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या 500 कोटींच्या आर्थिक व्यवहाराच्या आरोपांवर बोलताना त्यांनी, हे प्रकरण केवळ एसआयटी चौकशीच्या नावाखाली धूळफेक असून यावर तातडीने गुन्हा दाखल झाला पाहिजे, अशी मागणी केली आहे. गृहखाते या प्रकरणात अपयशी ठरल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
ADVERTISEMENT
भाजपच्या आमदाराने बाहेर काढली क्लिप
संजय राऊतांच्या दाव्यानुसार, सोशल मीडियावर व्हायरल झालेली ऑडिओ क्लीप विरोधी पक्षाने नव्हे तर खुद्द भारतीय जनता पक्षाच्या एका आमदाराने बाहेर काढली आहे. भाजपच्या अंतर्गत गळेकापू स्पर्धा आणि गटबाजीमुळेच हे स्टिंग ऑपरेशन समोर आले असून, केंद्रातील सत्तेच्या भविष्याबाबतच्या संशयामुळे पक्षात आपापसात कुरघोड्या सुरू असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.
हे ही वाचा : Maharashtra Weather : राज्यातील 'हे' चार जिल्हे उष्णतेने होरपळणार, IMD चा अंदाज
गुन्हा का नाही?
या संपूर्ण राजकीय नाट्यात भाजपचे नेते मुख्य भूमिकेत असून, एकनाथ शिंदेंच्या जवळच्या व्यक्तीला 500 कोटी रुपये दिल्याचा विषय भाजपच्या अंतर्गतच चर्चेला गेला आहे. तसेच, सुनेत्रा पवार यांच्या कार्यालयातील अधिकाऱ्यांना समन्स बजावले जात असताना, 500 कोटींच्या या गंभीर आर्थिक व्यवहाराबाबत मुख्यमंत्र्यांकडून अद्याप गुन्हा का दाखल केला जात नाही, असा सवाल राऊतांनी उपस्थित केला आहे.
हे ही वाचा : पाचशे कोटींच्या आरोपावर श्रीकांत शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, हसत-हसत काय बोलून गेले?
सखोल तपास करावा
शेवटी, एसआयटी स्थापन करण्यापूर्वी पोलिसांनी तात्काळ एफआयआर नोंदवून सखोल तपास करावा, असे आव्हान राऊतांनी दिले. आजवर नेमलेल्या एसआयटींच्या अहवालांवर आणि कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, राजकीय हितसंबंधांसाठी यंत्रणांचा वापर करून सरकार केवळ वेळ मारून नेत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
ADVERTISEMENT












