'मनोज जरांगेंना पर्सनल टार्गेट करावं लागेल...', ऑडिओ क्लिपमधील 'ती' महिला कोण.. असं का म्हणतेय?

मुंबई तक

• 07:39 PM • 22 Oct 2026

मनोज जरांगे यांनी सादर केलेल्या कथित ऑडिओ क्लिपमध्ये त्यांना वैयक्तिक लक्ष्य करण्याबाबत चर्चा झाल्याचा दावा केला जात असून, त्यातील महिलेच्या विधानामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.

manoj jarange audio clip personal target devendra fadnavis bjp shrikant shinde

प्रातिनिधिक फोटो

Google CTA

छत्रपती संभाजीनगर: मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी पत्रकार परिषदेत सादर केलेल्या कथित ऑडिओ क्लिपमुळे राज्याच्या राजकारणात मोठा गदारोळ निर्माण झाला आहे. या क्लिपवरून राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू असतानाच, त्यातील संभाषणात सहभागी असलेल्या एका महिलेच्या विधानाची चर्चा रंगली आहे.

हे वाचलं का?

'मनोज जरांगे यांच्या पर्सनल टार्गेटवर देवेंद्र फडणवीस आणि भाजप हेच असतील. पण आपण त्यापासून स्वतःचा बचाव केला पाहिजे. दुसरीकडे आपण मनोज जरांगेंनाच पर्सनल टार्गेट केलं पाहिजे,' असं विधान या कथित ऑडिओ क्लिपमध्ये ऐकायला मिळत आहे.

आता ही महिला नेमकी कोण आहे आणि ती कोणाला उद्देशून बोलत आहे, याबाबत अद्याप स्पष्टता नाही. मात्र, शिवसेनेच्या शिंदे गटाचे मंत्री उदय सामंत यांनी या ऑडिओ क्लिपमधील आवाज भाजपशी संबंधित व्यक्तींचे असल्याचा आरोप केला आहे. तसेच, क्लिपमधील महिलेचा आवाज श्वेता शालिनी यांच्यासारखा असल्याचा दावाही त्यांनी केला आहे. या आवाजाची अधिकृत पुष्टी झालेली नाही.

कथित ऑडिओ क्लिपमध्ये नेमकं काय म्हटलंय?

या कथित ऑडिओ क्लिपमध्ये एक महिला मनोज जरांगे, विधानसभा निवडणूक, भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांच्याशी संबंधित राजकीय चर्चेचा उल्लेख करताना ऐकायला मिळते.

महिला: चर्चा के विषय मैं दो अपॉईंट करना चाहूँगी... एक जरांगे-पाटील को.. ऑलरेडी 500 करोड रुपये पहुँच चुँके है. जो श्रीकांत शिंदे के पास से पहुँच चुँके है.. अब जरांगे-पाटील विधानसभा चुनाव मैं हमारे फायदे का रहेगा, नहीं फायदे का रहेगा इसपर मेरा मत अलग है.. कॅलक्युलेशन अलग है.. बाकी आप लोग सोचते है वो.. जो तथ्य है वो हैही...

हे ही वाचा>> 'ऑडिओ क्लिपमध्ये अतुल भातखळकर, श्वेता शालिनी यांच्यासारखा आवाज', उदय सामंतांचा भाजपवर थेट आरोप अन्...

मुझे लगता है की, जरांगे-पाटील के साथ हमे देखना चाहिए की, उसका पर्सनल टार्गेट देवेंद्र फडणवीस और बीजेपी रहेगा.. बाकी विधानसभा मैं हमारे फायदे का थर्ड फ्रंट बन सकता है.. इसलिए मुझे पर्सनली यही लगता है की, जरांगे-पाटील के विषय मैं हमे सिर्फ पर्सनल टार्गेट से बचना भी होगा.. और उसको पर्सनल टार्गेट भी करना होगा..

हॅविंग सेड दॅट.. जो विषय हमारे काम के नहीं है.. उस विषय के उपर हम बहुत जवाब देते है.. लेकिन जो विषय हमारे काम के है वो.. विषय हम मुद्दा भी नहीं बना पाते, उठा भी पाते..

जैसे श्रीरामपूर मैं एक एससी लड़के को कन्व्हर्ट कर दिया गया.. वो लडके का नाम लोखंडे है.. और उसको कन्व्हर्ट कर के उसको नमाज पढाया.. उसके घर मे उसके पिताजी को धमकाया.. और बहुत सारी चीजे हुई.. पर इस विषय मैं.. अभी तक किसी ने ना आवाज उठायी है ना सोशल मीडियापर हम इस को बहुत बड़ा विषय बना पाये है!

हे ही वाचा>> 'तो मराठवाड्यात गिळून घेईल तुम्हाला...', जरांगेंनी ऐकवलेल्या खळबळजनक ऑडिओ क्लिपमधील प्रत्येक शब्द जसाच्या तसा...

तो ऐसे जो पोलरायझिंग विषय है.. ऐसे विषय उठा कर जो हमारे विषय हो सकते है... हमे जैसे.. महाराष्ट्र से कुछ विषय हटाना है.. तो हमे ऐसे विषय उठाने पडेंगे और इसको बड़ा करना पडेगा. ये मेरा आज का मत है.

पहिली व्यक्ती: श्वेता जींच्या विधानानंतर माझ्या मनात अजयजी बाहेर पडले.. मला एक सबमिशन करायचं आहे. जरांगेंच्या आरोपामध्ये मदत करणाऱ्यांमध्ये भाजपचे नेते पण आहेत. ही माहिती आहे.. मग ही थर्ड फ्रंटसाठी चालू आहे की, फडणवीसांना बदनाम करण्यासाठी चालू आहे? याबाबत बोलता येईल.. हा काही चर्चेचा विषय नाही. फक्त एक माहिती म्हणून देतो.

नंबर दोन.. श्रीरामपूरचा विषय कळला, संभाजीनगरचा एक विषय.. त्याची बातमी मी टाकली होती. त्या विषयामध्ये ना विखेंनी मत व्यक्त केलंय ना संभाजीनगरच्या मराठा नेत्यांनी मत व्यक्त केलंय.

दुसरी व्यक्ती: लव्ह जिहादचा?

पहिली व्यक्ती: हो.. लव्ह जिहादचा... पूजा पवारही झालाय आणि त्या पोराला मारलंय पण. ती काल बातमी टाकलीय मी. एका बँकेच्या कर्मचाऱ्याने मुस्लिम महिलेला गाडीवर नेऊन दुसऱ्या ब्रँचमध्ये सोडलं. म्हणून त्याला तुफान धुतला. संभाजीनगरमध्ये.. याच्या आधी बोलत होता म्हणून मैदानावर मारलं. पूजा पवारला मारणारा मुसलमानच..

हे एवढं सगळं घडत असताना.. संभाजीनगरमधून एकालाही त्या विषयावर निषेध करावा वाटत नाही. हे भाजपच्या लोकांना करायला लावलं पाहिजे.

महिला: सुशीलजी.. लंके ने श्रीरामपूर मैं.. राम का नाम हटा दिया था पोस्टर मैं.. उसका व्हिडिओ है.. पर हम उसका विषय नहीं बना पाते.. क्यूँ की हमारे पास बोलने के लिए लोग नहीं है..

असं संभाषण या कथित ऑडिओ क्लिपमध्ये ऐकायला मिळत आहे. या क्लिपमधील व्यक्तींची ओळख, आवाजाची सत्यता आणि संभाषणाचा नेमका संदर्भ स्वतंत्रपणे पडताळला गेलेला नाही. 

या प्रकरणावरून राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू असून, कथित ऑडिओ क्लिपमधील दाव्यांची सत्यता तपासातून स्पष्ट होणे महत्त्वाचे ठरणार आहे. मनोज जरांगेंनी पत्रकार परिषदेत दाखवलेल्या ऑडिओ क्लिपची मुंबई Tak कोणतीही पुष्टी करत नाही.