'जरांगे पाटलांच्या विरोधात काय चाललंय?' राज ठाकरे संतापले, सत्ताधाऱ्यांना दिला गंभीर इशारा

मुंबई तक

• 01:43 PM • 23 Oct 2026

मुंबईत पार पडलेल्या मनसेच्या पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यानंतर माध्यमांशी त्यांनी संवाद साधला. यावेळी त्यांनी काही गंभीर बाबी उपस्थित केल्या. ते ऑडिओ क्लिपविषयी नेमकं काय म्हणाले, जाणून घेऊया.

Raj Thackeray

Raj Thackeray

Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

'सत्ता गेल्यावर गोष्टी अंगाशी येणार'

point

राज ठाकरेंची ऑडिओ क्लिपवर प्रतिक्रिया

Raj Thackeray : मनोज जरांगे पाटील यांच्या कथित ऑडिओ क्लिप प्रकरणानंतर महाराष्ट्रातील राजकारण चांगलेच तापले आहे. याविषयी बोलताना मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी ती क्लिप आली कशी असा सवाल उपस्थित केला आहे. मुंबईत पार पडलेल्या मनसेच्या पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यानंतर माध्यमांशी त्यांनी संवाद साधला. यावेळी त्यांनी काही गंभीर बाबी उपस्थित केल्या. ते ऑडिओ क्लिपविषयी नेमकं काय म्हणाले, जाणून घेऊया.

हे वाचलं का?

'पत्रकारांना धमकी'

मनोज जरांगे यांनी ऐकवलेल्या ऑडिओ क्लिपविषयी राज ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, 'प्रश्न 500 कोटींचा नाहीये. प्रश्न असा आहे की कशाप्रकारचं प्लॅनिंग चालतं? या प्लॅनिंगमध्ये तुम्हालापण (मीडियाला) धरलंय. कोण रिपोर्ट छापू शकतं आणि कोण रिपोर्ट छापू शकत नाही आणि छापलं नाहीतर आम्ही काय करु ही पत्रकारांना पण दिलेली धमकी आहे त्यामध्ये. मला वाटतं याचंही भान तुम्ही (मीडियाने) ठेवणं गरजेचं आहे. प्रिंटविषयी बोलले असले तरी चॅनेलविषयी बोलले नसतील ते.'

हे ही वाचा : 'अडीच वर्षानंतर हे संभाषण...' जरांगेंच्या ऑडिओ बॉम्बवर फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले?

'सत्ता गेल्यावर गोष्टी अंगाशी येणार'

यापुढं बोलताना ते म्हणाले की, 'प्रश्न त्यातला गंभीर असा आहे की नरेटिव्ह कशाप्रकारचं नरेटिव्ह पसरवलं जातं, कशाप्रकारे हे प्लॅनिंग करताहेत, कशाप्रकारे  एखाद्या माणसाला बदनाम करताहेत? आरक्षण मिळेल न मिळेल तो भाग वेगळा. पण एखादा माणूस बरोबर घ्यायचा, त्याला बदनाम करायचा आणि त्यानंतर त्याचीच माणसं कशी फोडायची? जरांगे पाटलांच्या विरोधात काय चाललंय काय? इथे बसून सगळ्या गोष्टींचं प्लॅनिंग. हे कोण होते ना बोलत ते आम्हालाही माहितीये कोण आहेत ते. मला असं वाटतं या लोकांनी नीट गोष्टींचा विचार करावा. उद्या ज्यावेळेस सत्ता जाईल ना त्यावेळेस कोणकोणत्या गोष्टी यांच्या अंगाशी येणार आहेत याचा यांना अंदाज नाहीये.' तसेच  ती क्लिप आली कुठून असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

हे ही वाचा : CJP चे आंदोलन आता थंडावणार? सौरव दास आणि आशुतोष रांकाने काय दिली हमी?

राज ठाकरेंचा दुष्काळी भागातील दौरा

सरकारने 325 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केला आहे. या तालुक्यांमध्ये नेमकी काय परिस्थिती आहे याचा आढावा घेण्यासाठी मनसेच्या जिल्हाध्यक्षांचा मेळावा पार पडला. यावेळी राज ठाकरेंनी सांगितले की ते दिवाळीनंतर या भागाचा दौरा करणार आहेत. तसेच मनसेतर्फे दुष्काळग्रस्तांसाठी काय मदत करता येईल हे देखील पाहिलं जाईल असं राज ठाकरे म्हणाले.