Maharashtra Budget 2026 , मुंबई : राज्याच्या राजकारणातील ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) आमदार जयंत पाटील आज (दि.6) विधिमंडळात अर्थसंकल्प सादर होत असताना उपस्थित राहू शकलेले नाहीत. गेल्या 36 वर्षांच्या प्रदीर्घ कारकिर्दीत पहिल्यांदाच अर्थसंकल्पावेळी सभागृहात अनुपस्थित राहण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. खुद्द जयंत पाटील यांनी ट्वीट करत याबाबतची माहिती दिली. ते नेमकं काय म्हणाले? जाणून घेऊयात...
ADVERTISEMENT
काय म्हणाले जयंत पाटील?
जयंत पाटील यांनी आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये भावना व्यक्त करताना म्हटले की: "गेल्या 36 वर्षांपासून मी विधानसभेचा सदस्य राहिलो आहे. या संपूर्ण कालावधीत आज पहिल्यांदाच अर्थसंकल्प सादर होत असताना दुर्दैवाने मी गैरहजर असणार आहे. माझी तब्येत बरी नसल्याने डॉक्टरांच्या सल्ल्याने मी विश्रांती घेत आहे."
जयंत पाटील हे स्वतः राज्याचे माजी अर्थमंत्री राहिले असून, त्यांनी विक्रमी 10 वेळा राज्याचा अर्थसंकल्प मांडला आहे. अशा परिस्थितीत, अर्थसंकल्पावरील चर्चेत त्यांचा अभ्यासपूर्ण सहभाग नेहमीच महत्त्वाचा मानला जातो. मात्र, आजच्या महत्त्वाच्या दिवशी त्यांच्या अनुपस्थितीमुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.
देवेंद्र फडणवीसांच्या अर्थसंकल्प सादर करताना मोठ्या घोषणा
राज्यात हरित क्षेत्र वाढविण्यासाठी ३०० कोटी वृक्ष लागवडीची मोहीम हाती घेण्यात येईल
राज्यातील 30 सप्टेंबर 2025 पर्यंत पीक कर्ज थकीत असलेल्या पात्र शेतकऱ्यांना 2 लाखांची कर्जमाफी जाहीर
नियमित कर्ज फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपये प्रोत्साहनपर लाभ देणार
राज्याच्या अर्थसंकल्पात मुंबईसाठी काय?
• राज्यात शहरी विकास 70 टक्के लोकसंख्या होणार आहे, त्यामुळे शहरी सेवा डिजीटल करणार आहे.
• बुलेट ट्रेन तीन स्थानकाच 2027 पर्यंत पूर्ण होईल.
• तिसरी मुंबई म्हणून उरण परिसरात विकास होईल, चौथी मुंबई वाढवण येथे होईल.
• मुंबईत बेकायदेशीर बांधकाम होऊ नये, यासाठी प्रयत्न केले जातील.
• एमएमआरमध्ये 10 लाख नवी घरं उभारणार, नवी अनधिकृत बांधकामे होणार नाहीत याचा रोडमॅप तयार होणार आहे.
• मुंबई आणि पुण्याला 50 अब्ज डॉलरचे केंद्र तयार करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.
• जगात गेमिंग क्षेत्रात अव्वल होण्यासाठी महाराष्ट्रात 295 पेक्षा जास्त गेमिंग स्टुडिओ तयार करण्यासाठी प्रयत्न केले जातील.
• मुंबईत केंद्राच्या मदतीने इंडियन इन्स्टिट्यूट क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी सुरू
लातूर, बारामती इथं रात्रीच्या विमान उड्डाणासाठीची यंत्रणा कार्यरत केली जाईल. मुंबई महानगरात जलमार्गाचे 340 किलोमीटर पर्यंत वाढवणार
1 कोटी 60 लाख पर्यंत असलेली प्रवासी संख्या 7 कोटीपर्यंत वाढेल. 2047 पर्यंत स्वच्छ उर्जेचे उद्दीष्ट. 32 हजार 756 कोटी मुख्यमंत्री सौर उर्जेसाठी खर्च करणार.. यावर्षी देखील २० हजार कोटींची तरतूद केली आहे. मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेत गिनीज बुकमध्ये महाराष्ट्राची नोंद झाली आहे
इतर महत्त्वाच्या बातम्या
ADVERTISEMENT











