Shivsena MLC Candidates : बच्चू कडू यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलताना त्यांनी शिवसेनेचे विधान परिषदेचे उमेदवार जाहीर केले. शिवसेनेकडून बच्चू कडू आणि नीलम गोऱ्हे विधान परिषदेवर जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी बोलताना ते काय म्हणाले जाणून घेऊया.
ADVERTISEMENT
'या दोघांचे फॉर्म आम्ही भरु'
बच्चू कडू यांच्या पक्षप्रवेशानंतर एकनाथ शिंदेंनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी शिवसेनेकडून विधान परिषद कोण लढवणार असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. यावेळी ते म्हणाले की, 'एक उमेदवार आहेत बच्चू कडू आणि दुसऱ्या आहेत नीलमताई गोऱ्हे. या दोघांचे फॉर्म आम्ही भरु. काल संध्याकाळी सर्व पदाधिकारी बसून आम्ही निर्णय घेतला. नीलमताईंनी देखील विधान परिषदेच्या उपसभापती म्हणून चांगलं काम केलेलं आहे. विधान परिषद सभागृहात अनेक उपक्रम त्यांनी राबवले आहेत. याचादेखील संघटनेला फायदा झालेला आहे.'
हे ही वाचा : पुणे : कोंढव्यात क्लोरीन गॅसच्या गळतीने खळबळ, 24 जण रुग्णालयात दाखल
महाविकास आघाडीत कितीतरी वेळा बिघाडी
अंबादास दानवे यांच्या उमेदवारीवरुन महाविकास आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता आहे का असा प्रश्न शिंदेंना विचारण्यात आला. याला उत्तर देताना ते म्हणाले की, आघाडीमध्ये आता कितीतरी वेळा बिघाडी झालेली आहे. आता जाऊ द्या. मी त्यांच्याबद्दल काय बोलायचं. मी आमचे जे महायुतीचे उमेदवार आहेत ते सर्व उमेदवार मोठ्या मताने निवडून येतील असा विश्वास देतो.
हे ही वाचा : विधानपरिषदेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार ठरला, 'या' माजी मंत्र्याच्या मुलाला संधी
प्रहार संघटनेचं काय?
बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेविषयी शिंदेंना विचारण्यात आले. यावर बोलताना ते म्हणाले की, 'प्रहार संघटना आता शिवसेनेशी संलग्न आहे. ती एक सामाजिक संघटना आहे, राजकीय नाही. त्यामुळे सामाजिक काम सुरु राहिलं पाहिजे. शिवसेना वाढवण्याचं काम, गावागावात, महाराष्ट्रभर ते करतील.'
ADVERTISEMENT











